Posts

गणपती बाप्पाचे गुज... एके दिनी रात्र समयी विश्व निजले असता, मी केले बाप्पाशी गुज जरा...। आपुले दुःख सांगुनी विश्व भंडावुनी सोडे त्याला, मग ठरविले आपणही जाणुनी घ्याव्या बाप्पाच्या दुःख लहरा...। बाप्पाला विचारता त्याचे दुःख सत्वरी, बोलु लागला तो मधुर स्वरी..। काय बोलु बाळा तुला, जगी चालणारऱ्या भक्तिचा नि त्यासाठी चाललेल्या हिशेबाचा  विट आला मला....। कुणी परिक्षेतील यशासाठी मोदक अर्पितो मला, तर कुणी नोकरी-धंद्यासाठी सोन्याच्या मुकुटाची लाच देऊ पाही मला, कुणी म्हणे बाळ खेळल अंगणी तर आणेल दहा दिनी माझ्या घरा, कुणी जोडीदार मगुनी भांडावुनी सोडतसे माझ्या जीवाला, कुणी तर रोज एक नाणे मज समोरी ठेवुनी त्याच्या रक्षणाची हमी मागतसे मला....। काय सांगावे माझ्या या भाबड्या बाळांना, मोदकाचा सुगंध जरी मला, घास मिळतो तयांना..। सोन्याचा मुकुट जरि मला, सम्रुद्धि मिळतसे त्यांना..। दश दिनी मी असता घरी, दुःखताप माझ्या चरणी नि आनंद सारा तयांना..। रक्षण मी करतसे जरी , रुक्याची ती सारी जमा -पुंजी त्याना...। तेव्हा सांग बाळा काय देतसे तु मला, ज्याने मी पावितसे तुजला.
Health is wealth For toung's taste,  we are eating waste.. Making diseases as our guest, Doctors then suggests us health tests, It makes money as a waste... Therefore homely food is the best😋😂
Everyone says that a person is a student and life is a best teacher of his life. But there are people who are persons and become our life by teaching us many good lessons in our life. They give directions to us in every twist and turns of life. There are 2 such incredible ladies in my life. My mother and my teacher Dr. Shital Chiddarwar....both are my life. One is very moderately educated(my mother), has solutions to every problem as she persue lots of wisdom which she gained from life... The other lady is simply outstanding (My teacher), she is very highly educated and have self enlightenment which she spread towards her students ....she is not just a teacher but a mother of her student.... Today on the occasion of Teachers day, I just want to express my love and respect to both of them. The beautiful shape of my life is only because of these two great ladies. I want to thank both of you for being my teacher and my life.😇😊
प्रेम काय असतं, ते अजुनही मला उमजत नाही..😍 कुणाच्या भेटीची ओढ असणं म्हणजे प्रेम?🤗 की त्याला न भेटताही तो मनात बसणं नि सगळीकडे दिसणं म्हणजे प्रेम? कुणाचा स्पर्श हवा हवासा वाटणं म्हणजे प्रेम?😘 की स्पर्श न होता ही त्याची जाणीव मनात असणं  म्हणजे प्रेम?😇 तो कधीच दुसऱ्याचा होऊ नये, असं वाटणं म्हणजे प्रेम? की त्याला आवडलेली व्यक्ती मिळावी हि भावना म्हणजे प्रेम?🌹 कुणाची साथ केवळ  आपल्याला लाभावी, असं वाटणं म्हणजे प्रेम? की आपण त्याला जन्मभर साथ करावी, हि कामना बाळगणं म्हणजे प्रेम?💑 जरा अवघड आहे, दोन्ही रंग वेगळे आहेत... पण जर ह्रिदयात कुणासाठी खास जागा असेल तर रंग आणि पद्धत कितीही वेगळी का असेना,..ते ..प्रेमच आहे...💓अगदी मनापासुन केलेलं प्रेम...💘
मी आता आयुष्य enjoy करायच ठरवलयं🌼🌺🌿🌷 भल्या मोठ्या पावसात भिजुन आनंद मिळवण्यापेक्षा,🌧️ लहान लहान तुषार सरित भिजायचं ठरवलयं,💧 मी आयुष्य enjoy करायच ठरवलयं.. Highway सारख्या रुंद रस्त्याने तर सगळेच चालतात,🛣️ मी मात्र अरुंद अश्या त्या गल्लीतुन वाट काढायचं ठरवलयं, मी आयुष्य enjoy करायच ठरवलयं.. पाऊस पडून गेल्यावर चिखल तर होणारच, नि अंगावरही उरणारं, पण मी raincoat घालुन बिंधास्त चिखल अंगावर घ्यायचं ठरवलयं,☔️ मी आता आयुष्य enjoy करायच ठरवलयं.. सतत सुखात असतांना तर कुणीही धुंद होईल,🎉 मी मात्र छोट्या छोट्या क्षणांमधेच बेधुंद व्हायचं ठरवलयं,🎊🎇 मी हे सुंदर आयुष्य खुप खुप enjoy करायच नि ते अधिकचं सुंदर बनवायचं ठरवलयं..😀😊
मन हे भिजले चिंब चिंब अश्रुंनी, का ते कळेना, काळ हा सरेना। ओढ लागे मनाला सोनेरी प्रभातीची घेऊनी येईल गारवा, अश्या त्या सुखाची। का ती तुटली नती, का ते तुटले बंध, ज्यात दडलेला होता जिव्हाळ्याचा निशीगंध। मन गेले गुंतुनी शंका-कुशंकांनी, खरंच लाभेल का त्यांचीही अधिराणी, जी देईल मनःशांती नि करेल शंका समाधान। मग तेव्हा पुन्हा भिजुनी जाईल हे मन, मायेच्या ओलाव्याने, भारावुनी टिपुस गाळील ते , नि नाचेल मोदाच्या नादाने।
हे मंद मंद वारे हे मंद मंद वारे, स्वछंद किती पहा रे, जणु स्पर्शुनी कुणाला, हे आणती क्षहारे। हे मंद मंद वारे, दरवळे किती पहा रे, मकरंद फुलांमधील जो, पसरती दाही दिशांत सारे। हि थोरवी अशी न्यारी, या मंद वाऱ्यांची, जो देऊनी गोड गारवा, करी आक्रंदाला शांत निवांत बरवा।
काट्यांच एक बरं असतं, कधीतरी टोचणार माहित असतं, शब्दांचे खेळ मात्र निराळे, कधी केव्हा बोचणार माहित नसतं। --------------------------------------------------------- कसे हे नियतीचे असे ऊन सावलीचे खेळ काळ सोकावला होता अन् आली होती वेळ। --------------------------------------------------------- दे जन्म मला या मात्रुभुमीच्या पोटी पुन्हा पुन्हा मरण्यासाठी। --------------------------------------------------------- काय बोलु आता मी शब्द माझे संपु लागले, तुझ्या अबोल्याने मनाचे बांध हे तुटू लागले। कळेल का  तुला कधी हि मुकी स्पंदने म्हणुनी अविश्वासाच्या नावेत डोलु लागले। पण आत्म्याने दिलेल्या कौलाने परत ते स्थिरावू लागले। ---------------------------------------------------------------------
एक आहे माझा सखा.. धारदार त्याचे नाक, पाणीदार त्याची नजर, रुबाबदार त्याचा डौल, आहे तो खुपच सुडौल.. निखळ त्याचे हास्य, करी तो साऱ्यांशी मधुर भाष्य, वाणी त्याची कडक, परि देत असे म ऊ सर उत्तर बेधडक.. आहे हे आई-बापाचे आग्याकारी मुल, कधीच मित्रांना देत नसे भुल, आता बायको मिळावी म्हणुनी चालली आहे चुल चुल, स्वप्न रंगवत असे तो तिचे मधुर... साऱ्या सख्या सवंगड्यांना करित असे विनवणी, बघाना मला पण माझ्या स्वप्नातली राणी, त्याची ती प्रेमाची निरागस ओढ पाहुनी, निघाले मित्र मंडळ आता शोध मोहिमेवरी... ही शोध मोहीम फत्ते होणार तरि कधी.. हा यक्ष प्रश्न पडलासे साऱ्या जगती, करितसे ईश्वर चरणी हिच प्रार्थना, लवकरी लाभु दे माझ्या सख्याला त्याची जीवनसंगीनी..
विरहाचे गुपीत.... ही शाळा,  ही शाळा ,  अशी ही पाठशाळा... इथेच आम्ही गायलो, नाचलो,  दंगलो गुंगलो नि प्रफुल्लीत झालो,  हिने स्फुरविले आम्हा प्रगतीकडे झेपावण्यासाठी अंगीकारुनी अष्टपैलु स्रुष्टी... इथे कधी गायलो-नाचलो, तर कधी गंभीर झालो, कधी आसुसलो होतो,  ज्ञानाने परिपुर्ण होण्यासाठी.... परि आज तो दिन जवळ आला, जसा लेकिला विरह झाला,  हि खंत लागे मनाला, तेव्हा जीव अश्रुंनी पाघळला... दिवस येता येता हि ओंजळ स्म्रुतींनी भरघच्च भरली, आशेची किरणे पदरात पडली, जीवनाची नवी वाट सापडली... असाही अंत असावा अश्रुंना,  हे पाहुनी आज मला, जीवनाच्या प्रत्येक वळणावरी येणाऱ्या विरहाचे गुपीत कळले...
लगता है, तु मुझे दुर से ही सही मगर ,   देखे जरुर। लगता है, पता ना चले मुझे,  मगर मै तेरे ख्वाबो ख्यालो मे हमेशा बनी रहु। लगता है, तुझे मेरे याद करनेपर हिचकिया लगे, जो मेरा नाम लेते ही थम जाए। लगता है, तेरे रात के हर सपने मे मै तेरे साथ रहु। लगता है, जब तु आइनेमे देखे तो तेरी आँखो मे,  तुझे मै नजर आँऊ। लगता है,  मेरे खुशी से तु हस पड़े, और मेरी चोट का तुम्हे एहेसास हो।  ऐसा ये हमारा प्यार, बड़ाही खास हो।
थोर हि भुमी थोर हि भुमी माझी, थोर तिची लेकरे तिच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले। थोर ती आई जिने जनली अशी शुर लेकरे,  दुध नव्हे जणू शुरत्व तिने त्यासी पाजले। थोर तो बाप ज्याने असे टणक घडे घडवले,  रणांगणी लेकराचे रक्त पाहुनी मस्तक त्याचे उंचावले। थोर ती बहिण जिने आपुले बंधन या मात्रुभुमीला वाहिले, नि मात्रुबांधवांशी बांधीलकीचे नाते जपले। थोर ती पत्नी जिने सर्वस्व आपुले दिधले, कपाळीचा टिळा लावूनी मात्रुभुमीस पुजले। अशा या थोर , माझ्या मायभुमीला शतकोटी प्रणाम।
नाजुक कळी ‌वारा आला सळसळून गेला,  एका नाजुक कळीला दुःखावून..... ‌दुःखात भर टाकित तिच्या, भवराहि आला नि त्रुप्त झाला तिचा रस पिऊन... ‌ह्रिदय कळिचे इवलेसे, झाले ती दुःखी,  परी करे  सगळ्यांंना  सुगंध देवूनी आनंदी....
पर्णसावली एक उंच स्त्रि भासे असे नटले हे झाडं घेऊनी पदर हिरवा देई मायेचा गारवा पाठीवर पसरे केस अशी पसरे पर्णसावली देत सौख्याचा आनंद  म्हणे मी ही हसलेली लोक होती घर्माने ओले मला तर थंडीत घाम पाझरे अशी हि हिसका मारूनी छिडकारे मोह मणी सारे या मोह मण्यात भिजूनी घे आनंद स्वास्थ्याचा हो ताजातवाना, देई श्वास विश्वाचा तोच विश्वासाचा..
तु सोनुली तु सोनुली, तु गोडुली... तुझ्या आगमनाने ही सारी नाती बदलली... आजवर फक्त मुलगी असलेली ती बायको,  मायाळू आई झाली.. फक्त मजेत नि मस्तीत जगणारा तो नवरा,  जबाबदार बाप झाला.. मध्य वयीन असलेली, तरिही तारूण्य मिरवणारी ती सासू,  आजी झाली... चश्मा म्हातारपणं दाखवतो म्हणुन चश्मा न लावता पेपर वाचणारे, ते सासरे आजोबा झाले.. मी घरात शेंडेफळ म्हणुन माझेच सगळ्यांनी एकावे,  असे सांगणारी ती खट्याळ बहीण, आत्या झाली.. सतत रुबाबात असणारा तो दादा,  आता मामा झाला... ताई-ताई करत हे ना ते मागणारी, ती साळी  आता मावशी झाली.... अशा या इवल्याश्या परिने सगळ्या नात्यांना नविन परिभाषा दिली, नि सारी नती अधिकच घट्टपणे विणली...
तु जेव्हा अनब्लाँक करशील मला.... जेव्हा तु अनब्लाँक करशील मला, तुझ्या इनबाँक्स मधे मेसेजेस चा पाऊस पडलेला असेल... कदाचीत तेव्हा तु अर्ध्या वयात असशील... मग तुला वेळ नसल्याने तु ते तसेच वाचायचे सोडुन देशील, मनात माझी गोड आठवण जपून नि बायकोपासुन लपवून.... मग बायकोच्या भितीने परत ब्लाँक करशील नि पुढचं आयुष्य जगु लागशील.... एके काळी कधीतरी आयुष्याच्या संध्याकाळी, कोणीच सोबत नसतांना तुला परत माझी आठवण होइल,  मग परत तु त्या नंबर मधे डोकावशील जो कधी काळी तु ब्लाँक केला होतास... आता तु तो अनब्लाँक करशील नि सुरवातीपासुन शेवटर्पंत वाचुन काढशील... मग तुला कळेल माझं तुझ्यावर खर प्रेम होतं, पण तुला कधी ते उमजलच नाही.... मग सांगशील तुझ्या पुढच्या पिढ्यांना... हो तेव्हा त्या तुझ्या पुढच्या पिढ्या असतील ज्याची स्वप्न तु माझ्या सोबत रंगवली होती कधीतरी .... पण आता त्यात मी कुठेच नसेन... मग सांगशील तुझ्या नातवंडांना, होती माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी एक वेडी... जिने बघा काय ही प्रेमाची किमया केली..... इनबाँक्स बघताना कळेल तुला की सुरवातीला मेसेजेसची गंगा भरुन-भरुन वाहिली
एक क्षण....🌄 एका क्षणी मी डोकवित होते, निरखीत होते अवकाशी, तेथे दिसले अलौकिक, अनमिक नि आल्हाददायी सौंदर्य... बहरली होती एक सुं$दर छटा रंग होता तिचा सुंदर सावटा लाल, नीळा नि पिवळा दाटा चहुं दिशांना पसरल्या होत्या सोनेरी लाटा... ही सारी किमया त्या नारायणाची जो चालला होता घ्यावया विश्रांती कामाचे संपवुनी तास तो जाहला आनंदी अन् त्याचा किरण-किरण मावळू लागला सहजगणी... नारायणाने चातुर्य दाखविले जाता जाता त्याचे सप्तरंग हिरावून घेतले नि हळुहळू आकाश काळोखात बुडाले तेव्हा ते सप्तरंग सावळ्या रंगात बदलले... पण ...तरिही हा प्रवास इथेच थांबला नाही पुन्हा एका नव्या क्षणी तोच आनंद मी नव्याने लुटला...🤗
समाज समाज हा चांगल्याचा-वाईटाचा, सुखाचा-दःखाचा, आनंदाचा-नि-निराशेचा.... अधिकाधिक श्रिमंताचा, कमीतकमी गरीबांचा बेईमानाचा, अत्याचाराचा नि अन्यायावर मात करणारऱ्या न्यायाचाही । आगीत ढकलणारा हा समाज,  कधी अग्निदिव्यात तापलेल्या मनुष्याचा। दिवसा काळोखाचा  नि रात्री उजेडाचा । सुकाळात नास्तिकतेचा तर दुष्काळात आस्तिकतेचा । कधी जखमांवर मीठ चोळणारा तर कधी त्यावर मायेचे औषध लावणारा । माणसाला राक्षसात नि  राक्षसाला माणसात बदलणारा हा समाज। असा हा समाज कधी काटे टोचणारा तर कधी फुलांची म्रुदुता बहाल करणारा । दुःखद असुनही, सुखद ठरणारा नि मानवाला अस्तित्व देणारा हाच तो समाज।
नाते तुझे नि माझे तु हा असा अबोल,  मी ही अशी बोलकी... मी सततं होते व्यक्त,  पण तु मात्र नेहेमीच अव्यक्त..... माझे बोललेले शब्दही तुज पर्यंत पोचत नाही,  मला मात्र तुझे मनातले शब्दही उमजतात..... तु मला जपण्यासाठी सतत माझा अहंकार मोडतो,  पण मी तुला जपण्यासाठी तुझा अहंकार देखील जपते..... तु पहाटे पहाटे मिळणारी उर्जा आहेस,  तर मी संध्याकाळी थकुन आल्यावर मिळणारा विसावा आहे..... तु आहे यशानंतर मिळणारा आल्हाद,  पण मी आहे अपयशानंतर मिळणारं नाविन्यातील चैतन्य..... तु गुंफतो शब्दाना कविता करण्यासाठी,  मी गुंफते भावनांना कवितेत व्यक्त होण्यासाठी.....
   प्रेम 😍😊   प्रेम प्रेम हे काय असतं?  माझं तुझ्याशी आणि तुझ माझ्याशी  झालेल tie असतं.....  प्रेम प्रेम हे काय असतं?   Positive ला Negative कडे नि   Negative ला   positive   कडे आओढणारं attraction असतं......  प्रेम प्रेम हे काय असतं?  Strong acid नि Strong alkali   मिळूनं बनलेलं   Neurtral पाणी असतं....  प्रेम प्रेम हे काय असतं?  कधी forced frequency आणि  Natural frequency   मिळून निर्माण होणारा resonance असतो, तर कधी high   frequency आणि elastic body  मिळुन येणारी स्थिरता   असते......   प्रेम प्रेम हे काय असतं?    रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात लावलेला halogen चा मोठ्ठा        दिवा असतो.....    असं हे प्रेम, एक unbreakable nuclear fusion             असतं...जे harmful to everyone असतं.....😉