Posts

Showing posts from October, 2018
नाते बहिण भावाचे भाऊ म्हणजे काळजीवखहू सरकार,  ह्यावर सोपवून द्यायचा असतो सगळा भार... भाऊ म्हणजे भांडण तंटा नि दे मार.. पण भाऊ महणजे फुल्ल शेअरिंग.. त्याचा शर्ट तिचा , नि तिचे जँकेट तो धोपपणार... बहिणीने चाहा करावा म्हणुन तो तिला रिश्वत देणार आइस्क्रिमची... तर त्याने कपडे नीट ठेवावे म्हणुन ती भुल घालणार त्याला  गोडाची.. बहिण कितीही असु देत बंदर,  पण भावाला मात्र नेहेमीच दिसते ती अतिसुंदर... भावाला आवडली कुणी स्वप्नससुंदरी, तर तो पटवणार बहिणीलाच आधी... त्यानंतर सारे कुटुंब सहज होणार राजी... कचाकचा भांडणखरा हा भाऊ,  बहिणीच्या लग्नात मात्र वेगळखच दिसतो.... वरवर रुबाब दाखवत असला तरि मनाने मात्र खचतो... बहिणीला हि ह्या भावाचा खांदा सुटत नाही,  नि भावाचे अश्रु देखील काहि केल्या आटत नाही... असे हे सुरेख बंधन, एकमेकांना सदैव मायेची साद घालते.. नि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, नाविन्याने पुन्हा तग धरते..