Posts

Showing posts from June, 2019
बाबांचा अंश असे जरी मी, जग तु दाखवलेस मला। ते नसताना हयात, निधड्या छातीने घडवलेस मला। आईचे ह्रिदय जरी कोवळे तुझे, बाबांचा कठोरपणा आणलास खरा। आई नि बबांची पात्र उत्तम निभावलीस, नेहेमीच फटके देऊन जवळ केलस मला। मुलगी म्हणुन घडणार केलीस, पदर सांभाळायला शिकवलस। मुलासारखी  कमवण्याची जिद्द देउन, खंबीरहि बनवलस। पाया मजबुत करण्यासाठी, शिक्षणाची कास धरलीस। अशास्वत सुखाची नाहि, तर शास्वत सुखाची दार तु उघडलीत। यश म्हणजे केवळ पैसा, हे गणित तु मोडुन काढलस। निरंतर अपयशाला पदक्रांत करुन, यश मिळवण्याच सामरर्थ्य तु दिलस। सुखजन्य परिस्थितीत सगळेच आनंद मिळवतात, तु मला दुःखात नि संघर्षात आनंद शोधायला शिकवल। रात्रीच्या अंधारातही, दिव्याने मिळणारऱ्या उजेडाची सकरात्मकता तु जपुन ठेवलीस। तु आहे माझ्या आयुष्याची शिल्पकार, अनेक जन्मातही नाही फेडु शकणार मी तुझे उपकार। कधी नावं कमवले जगात, तर तुझेच कमवीन मी आई, कारण बाबांनी मला सोडुन जाण्याची , खुपच केली घाई। वडिल केवळ जन्मदाते, आई माझे सर्वस्व, त्याग मुर्ती माझ्या आईपुढे, आहे मी आज क्षमस्व। लक्ष-लक्ष नमन तुला आई, लक्ष-लक