हे मंद मंद वारे
हे मंद मंद वारे,
स्वछंद किती पहा रे,
जणु स्पर्शुनी कुणाला,
हे आणती क्षहारे।
हे मंद मंद वारे,
दरवळे किती पहा रे,
मकरंद फुलांमधील जो,
पसरती दाही दिशांत सारे।
हि थोरवी अशी न्यारी,
या मंद वाऱ्यांची,
जो देऊनी गोड गारवा,
करी आक्रंदाला शांत निवांत बरवा।
Comments
Post a Comment