प्रेम तुझे नि माझे

 तुझ्यासाठी प्रेम म्हणजे अंगाला झालेला स्पर्श....

माझ्यासाठी प्रेम म्हणजे हृदयात उठलेली स्पंदनं।


तुझ्यासाठी प्रेम म्हणजे हातात घेतलेला हात....

माझ्यासाठी प्रेम म्हणजे जन्मभराची साथ।


तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सतत व्यक्त होणारे बोल...

माझ्यासाठी प्रेम म्हणजे नजरेने व्यक्त झालेले अबोल।


तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सौंदर्याचं आकर्षण..

माझ्यासाठी प्रेम म्हणजे दोघांचं भावनिक संकर्षण।


तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सतत केलेली तडजोड,

माझ्यासाठी प्रेम म्हणजे मनापासुन जुळवलेले असे विजोड।

-रोहिणी भुते गवळी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री