दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
आंब्याच्या पनानी दार सजले सुंदर,
प्रणाना श्वास मिळाले दीर्घकाळ निरन्तर...
आपट्याच्या पानाला ह्रदयाचा आकार,
सोन्यासारखे पान दूर करी हृदयाचे विकार...
चौरस्त्याची रांगोळी रेखियाली रंगानी,
जीवनात केली त्यांनी सौभाग्याची भरणी...
अवजारांची पूजा, वाहनांना हार,
यंत्रांनी नि दळणवळनानेच तर लावला आपल्या प्रगतीला हातभार...
दशमीच्या दिवशी देवी सीमोल्लंघनाला निघाली,
असुरारुपी रोगांच्या वधाने आरोग्याचं देणं ती देऊन गेली...
चला करूया साष्टांग दंडवत तिजलां,
दसऱ्याचा सण हा हार्दिक शुभेच्छानी सजला....
-Rohini Bhute Gawali
Comments
Post a Comment