निसर्गाशी मैत्री
चला करुया निसर्गाची परतफेड,
घालुया पुन्हा नव्याने सौंख्याची मुहुर्तमेढ !
लवलवत्या पानावर झुळ झुळेल वारा,
कोसळतिल भारावुनी मग श्रावणाच्या धारा!
गारव्यात शुभ्र तर श्रावणात हिरवी साडी,
नेसुनी नटेल हि धरणी!
नाही करावी लागणार मेघराजाला मग,
यज्ञ्याची मनधरणी!
नाहि लागणार शुद्ध श्वासालाही ,
ऑक्सिजनचा मास्क!
झऱ्याच्या त्या गोड पाण्याने मिळेल,
तृष्णेला अवकाश!
चला तर माझ्या बांधवांनो,
करुया जंगलाची पेरणी!
परत देवूया धरणीच्या जिवांना,
त्यांची हक्काची धरणी!
चला करुया नैसर्गिक जिन्नसांची निर्मिती,
समतोल साधुया आता सृष्टिच्या संगती!
- रोहिणी भुते गवळी.
Comments
Post a Comment