मी आता आयुष्य enjoy करायच ठरवलयं🌼🌺🌿🌷

भल्या मोठ्या पावसात भिजुन आनंद मिळवण्यापेक्षा,🌧️
लहान लहान तुषार सरित भिजायचं ठरवलयं,💧
मी आयुष्य enjoy करायच ठरवलयं..

Highway सारख्या रुंद रस्त्याने तर सगळेच चालतात,🛣️
मी मात्र अरुंद अश्या त्या गल्लीतुन वाट काढायचं ठरवलयं,
मी आयुष्य enjoy करायच ठरवलयं..

पाऊस पडून गेल्यावर चिखल तर होणारच,
नि अंगावरही उरणारं,
पण मी raincoat घालुन बिंधास्त चिखल अंगावर घ्यायचं ठरवलयं,☔️
मी आता आयुष्य enjoy करायच ठरवलयं..

सतत सुखात असतांना तर कुणीही धुंद होईल,🎉
मी मात्र छोट्या छोट्या क्षणांमधेच बेधुंद व्हायचं ठरवलयं,🎊🎇
मी हे सुंदर आयुष्य खुप खुप enjoy करायच नि ते अधिकचं सुंदर बनवायचं ठरवलयं..😀😊

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री