तु जेव्हा अनब्लाँक करशील मला....


जेव्हा तु अनब्लाँक करशील मला,
तुझ्या इनबाँक्स मधे मेसेजेस चा पाऊस पडलेला असेल...
कदाचीत तेव्हा तु अर्ध्या वयात असशील...
मग तुला वेळ नसल्याने तु ते तसेच वाचायचे सोडुन देशील, मनात माझी गोड आठवण जपून नि बायकोपासुन लपवून....
मग बायकोच्या भितीने परत ब्लाँक करशील नि पुढचं आयुष्य जगु लागशील....
एके काळी कधीतरी आयुष्याच्या संध्याकाळी, कोणीच सोबत नसतांना तुला परत माझी आठवण होइल, 
मग परत तु त्या नंबर मधे डोकावशील जो कधी काळी तु ब्लाँक केला होतास...
आता तु तो अनब्लाँक करशील नि सुरवातीपासुन शेवटर्पंत वाचुन काढशील...
मग तुला कळेल माझं तुझ्यावर खर प्रेम होतं, पण तुला कधी ते उमजलच नाही....
मग सांगशील तुझ्या पुढच्या पिढ्यांना...
हो तेव्हा त्या तुझ्या पुढच्या पिढ्या असतील ज्याची स्वप्न तु माझ्या सोबत रंगवली होती कधीतरी ....
पण आता त्यात मी कुठेच नसेन...
मग सांगशील तुझ्या नातवंडांना, होती माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी एक वेडी...
जिने बघा काय ही प्रेमाची किमया केली.....
इनबाँक्स बघताना कळेल तुला की सुरवातीला मेसेजेसची गंगा भरुन-भरुन वाहिली..
पण नंतर मात्र तिचा वेगही मंदावला आहे आणि पाणी ही आटले आहे.....
मी तुला एक प्रेमळ शेवटचा मेसेज करेन नि हे जग सोडेन....
तो वाचुन जेव्हा तुझा एक अश्रु ओघळेल, तेव्हा माझं प्रेम पुर्णत्वास जाईल.....
आणि मी स्वर्गात तुझ्या प्रेमाने सुखावेल....

Comments

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री