शोध बाबांचा
बाबा कधी पाहिले नव्हते
जीवनातले हे सुख राहिले होते
कधी माझ्या बाबांना मी मामात
तर कधी काकात शोधत होते
कधी आजोबांत
तर कधी शेजारच्या काकात शोधत होते
लग्नानंतर तर सआसर्यांमधे शोधत होते
पण शोध काही संपला नाही...
मग बाळाने माझ्या एके दिवशी दाखवुन दिले
बाबा कसे असतात...
आणि नकळतपणे नवर्यातच मला माझे बाबा दिसले.
रोहिणी भुते गवळी
Comments
Post a Comment