विठ्ठल साधावा
नको रडू पंढरीची वारी चुकली म्हणुनी..
विठ्ठलाला बघ जरा अंतःकरण उघडुनी..
तो नाहि पंढरपुरी, तो नाही चंद्रभागा तिरी..
तो आहे चराचरी त्यासी ओळख रे वेड्या तु सत्वरी ।
तु घे विठठ्ठलाची ध्यानमुद्रा नि हो मग्न..
बघ होतंय कि नाही सारे विश्व तुला संलग्न..
शिकवी आपणास तो, तुझेच सारे दीन ते बंधु..
रंग नाही गोरा म्हणुनि नको त्यांसी तु निंदु।
अर्पियली नाही तुळशी म्हणुनि,
होऊ नकोस तु दुःखी..
कर तुळशींची पेरणी ,
नि होउ दे प्राणवायुत वृद्धि..
तुझा विठ्ठल बघ त्वरेने तुझ्यासाठी धावेल
वैकुंठाचे सुख तुला धर्तीवरच गावेल।
चंदनाचा टिळा जसा जप तुझे चारित्र्य..
गरजुंच्या हाकेशी धावुनी जप विठ्ठलाचे मातृत्व..
सत्याची कास सोडु नकोस
बेइमानिचा त्रास होउ नकोस..
सद्विचारांच्या गजरात भेट तु विठ्ठलाला
प्रतिदिनी होई बघ आषाढीचा पर्व साजरा।
असाच जीवनाच्या किर्तनात आम्हास
विठ्ठल भेटावा, नव्हे विठ्ठल साधावा।
जय जय रामकृष्ण हरी।
जय जय रामकृष्ण हरी।
-रोहिणी भुते गवळी
Comments
Post a Comment