मन हे भिजले चिंब चिंब अश्रुंनी,
का ते कळेना, काळ हा सरेना।

ओढ लागे मनाला सोनेरी प्रभातीची
घेऊनी येईल गारवा, अश्या त्या सुखाची।

का ती तुटली नती, का ते तुटले बंध,
ज्यात दडलेला होता जिव्हाळ्याचा निशीगंध।

मन गेले गुंतुनी शंका-कुशंकांनी,
खरंच लाभेल का त्यांचीही अधिराणी,
जी देईल मनःशांती नि करेल शंका समाधान।

मग तेव्हा पुन्हा भिजुनी जाईल हे मन,
मायेच्या ओलाव्याने,
भारावुनी टिपुस गाळील ते ,
नि नाचेल मोदाच्या नादाने।

Comments

Popular posts from this blog

निसर्गाशी मैत्री

प्रेम तुझे नि माझे