तु सोनुली

तु सोनुली, तु गोडुली...
तुझ्या आगमनाने ही सारी नाती बदलली...

आजवर फक्त मुलगी असलेली ती बायको,
 मायाळू आई झाली..

फक्त मजेत नि मस्तीत जगणारा तो नवरा, 
जबाबदार बाप झाला..

मध्य वयीन असलेली, तरिही तारूण्य मिरवणारी ती सासू, 
आजी झाली...

चश्मा म्हातारपणं दाखवतो म्हणुन चश्मा न लावता पेपर वाचणारे, ते सासरे आजोबा झाले..

मी घरात शेंडेफळ म्हणुन माझेच सगळ्यांनी एकावे, 
असे सांगणारी ती खट्याळ बहीण, आत्या झाली..

सतत रुबाबात असणारा तो दादा, 
आता मामा झाला...

ताई-ताई करत हे ना ते मागणारी, ती साळी
 आता मावशी झाली....

अशा या इवल्याश्या परिने सगळ्या नात्यांना नविन परिभाषा दिली,
नि सारी नती अधिकच घट्टपणे विणली...

Comments

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री