एक आहे माझा सखा..

धारदार त्याचे नाक,
पाणीदार त्याची नजर,
रुबाबदार त्याचा डौल,
आहे तो खुपच सुडौल..

निखळ त्याचे हास्य,
करी तो साऱ्यांशी मधुर भाष्य,
वाणी त्याची कडक,
परि देत असे मसर उत्तर बेधडक..

आहे हे आई-बापाचे आग्याकारी मुल,
कधीच मित्रांना देत नसे भुल,
आता बायको मिळावी म्हणुनी चालली आहे चुल चुल,
स्वप्न रंगवत असे तो तिचे मधुर...

साऱ्या सख्या सवंगड्यांना करित असे विनवणी,
बघाना मला पण माझ्या स्वप्नातली राणी,
त्याची ती प्रेमाची निरागस ओढ पाहुनी,
निघाले मित्र मंडळ आता शोध मोहिमेवरी...

ही शोध मोहीम फत्ते होणार तरि कधी..
हा यक्ष प्रश्न पडलासे साऱ्या जगती,
करितसे ईश्वर चरणी हिच प्रार्थना,
लवकरी लाभु दे माझ्या सख्याला त्याची जीवनसंगीनी..

Comments

Popular posts from this blog

निसर्गाशी मैत्री

प्रेम तुझे नि माझे