थोर हि भुमी
थोर हि भुमी माझी, थोर तिची लेकरे
तिच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले।
थोर ती आई जिने जनली अशी शुर लेकरे,
दुध नव्हे जणू शुरत्व तिने त्यासी पाजले।
थोर तो बाप ज्याने असे टणक घडे घडवले,
रणांगणी लेकराचे रक्त पाहुनी मस्तक त्याचे उंचावले।
थोर ती बहिण जिने आपुले बंधन या मात्रुभुमीला वाहिले,
नि मात्रुबांधवांशी बांधीलकीचे नाते जपले।
थोर ती पत्नी जिने सर्वस्व आपुले दिधले,
कपाळीचा टिळा लावूनी मात्रुभुमीस पुजले।
अशा या थोर , माझ्या मायभुमीला शतकोटी प्रणाम।
Comments
Post a Comment