समाज

समाज हा चांगल्याचा-वाईटाचा,
सुखाचा-दःखाचा, आनंदाचा-नि-निराशेचा....

अधिकाधिक श्रिमंताचा, कमीतकमी गरीबांचा
बेईमानाचा, अत्याचाराचा नि अन्यायावर मात करणारऱ्या न्यायाचाही ।

आगीत ढकलणारा हा समाज, 
कधी अग्निदिव्यात तापलेल्या मनुष्याचा।

दिवसा काळोखाचा 
नि रात्री उजेडाचा ।

सुकाळात नास्तिकतेचा तर
दुष्काळात आस्तिकतेचा ।

कधी जखमांवर मीठ चोळणारा
तर कधी त्यावर मायेचे औषध लावणारा ।

माणसाला राक्षसात नि 
राक्षसाला माणसात बदलणारा हा समाज।

असा हा समाज कधी काटे टोचणारा
तर कधी फुलांची म्रुदुता बहाल करणारा ।

दुःखद असुनही, सुखद ठरणारा
नि मानवाला अस्तित्व देणारा हाच तो समाज।

Comments

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री