नाते तुझे नि माझे


तु हा असा अबोल, 
मी ही अशी बोलकी...

मी सततं होते व्यक्त, 
पण तु मात्र नेहेमीच अव्यक्त.....

माझे बोललेले शब्दही तुज पर्यंत पोचत नाही, 
मला मात्र तुझे मनातले शब्दही उमजतात.....

तु मला जपण्यासाठी सतत माझा अहंकार मोडतो, 
पण मी तुला जपण्यासाठी तुझा अहंकार देखील जपते.....

तु पहाटे पहाटे मिळणारी उर्जा आहेस, 
तर मी संध्याकाळी थकुन आल्यावर मिळणारा विसावा आहे.....

तु आहे यशानंतर मिळणारा आल्हाद, 
पण मी आहे अपयशानंतर मिळणारं नाविन्यातील चैतन्य.....

तु गुंफतो शब्दाना कविता करण्यासाठी, 
मी गुंफते भावनांना कवितेत व्यक्त होण्यासाठी.....

Comments

  1. भेट एकदा तरी या जगी कारण दूसर जग नाही तुझ्याविना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री