एक क्षण....🌄

एका क्षणी मी डोकवित होते,
निरखीत होते अवकाशी,
तेथे दिसले अलौकिक, अनमिक नि आल्हाददायी सौंदर्य...

बहरली होती एक सुं$दर छटा
रंग होता तिचा सुंदर सावटा
लाल, नीळा नि पिवळा दाटा
चहुं दिशांना पसरल्या होत्या सोनेरी लाटा...

ही सारी किमया त्या नारायणाची
जो चालला होता घ्यावया विश्रांती
कामाचे संपवुनी तास तो जाहला आनंदी
अन् त्याचा किरण-किरण मावळू लागला सहजगणी...

नारायणाने चातुर्य दाखविले
जाता जाता त्याचे सप्तरंग हिरावून घेतले
नि हळुहळू आकाश काळोखात बुडाले
तेव्हा ते सप्तरंग सावळ्या रंगात बदलले...

पण ...तरिही हा प्रवास इथेच थांबला नाही
पुन्हा एका नव्या क्षणी
तोच आनंद मी नव्याने लुटला...🤗

Comments

Popular posts from this blog

निसर्गाशी मैत्री

प्रेम तुझे नि माझे