प्रेम काय असतं, ते अजुनही मला उमजत नाही..😍

कुणाच्या भेटीची ओढ असणं म्हणजे प्रेम?🤗
की त्याला न भेटताही तो मनात बसणं नि सगळीकडे दिसणं म्हणजे प्रेम?

कुणाचा स्पर्श हवा हवासा वाटणं म्हणजे प्रेम?😘
की स्पर्श न होता ही त्याची जाणीव मनात असणं  म्हणजे प्रेम?😇

तो कधीच दुसऱ्याचा होऊ नये, असं वाटणं म्हणजे प्रेम?
की त्याला आवडलेली व्यक्ती मिळावी हि भावना म्हणजे प्रेम?🌹

कुणाची साथ केवळ  आपल्याला लाभावी, असं वाटणं म्हणजे प्रेम?
की आपण त्याला जन्मभर साथ करावी, हि कामना बाळगणं म्हणजे प्रेम?💑

जरा अवघड आहे, दोन्ही रंग वेगळे आहेत...
पण जर ह्रिदयात कुणासाठी खास जागा असेल तर रंग आणि पद्धत कितीही वेगळी का असेना,..ते ..प्रेमच आहे...💓अगदी मनापासुन केलेलं प्रेम...💘


Comments

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री