गणपती बाप्पाचे गुज...

एके दिनी रात्र समयी विश्व निजले असता,
मी केले बाप्पाशी गुज जरा...।
आपुले दुःख सांगुनी विश्व भंडावुनी सोडे त्याला,
मग ठरविले आपणही जाणुनी घ्याव्या बाप्पाच्या दुःख लहरा...।
बाप्पाला विचारता त्याचे दुःख सत्वरी,
बोलु लागला तो मधुर स्वरी..।

काय बोलु बाळा तुला, जगी चालणारऱ्या भक्तिचा नि त्यासाठी चाललेल्या हिशेबाचा  विट आला मला....।

कुणी परिक्षेतील यशासाठी मोदक अर्पितो मला,
तर कुणी नोकरी-धंद्यासाठी सोन्याच्या मुकुटाची लाच देऊ पाही मला,
कुणी म्हणे बाळ खेळल अंगणी तर आणेल दहा दिनी माझ्या घरा,
कुणी जोडीदार मगुनी भांडावुनी सोडतसे माझ्या जीवाला,
कुणी तर रोज एक नाणे मज समोरी ठेवुनी त्याच्या रक्षणाची हमी मागतसे मला....।

काय सांगावे माझ्या या भाबड्या बाळांना,
मोदकाचा सुगंध जरी मला, घास मिळतो तयांना..।
सोन्याचा मुकुट जरि मला, सम्रुद्धि मिळतसे त्यांना..।
दश दिनी मी असता घरी, दुःखताप माझ्या चरणी नि आनंद सारा तयांना..।
रक्षण मी करतसे जरी , रुक्याची ती सारी जमा -पुंजी त्याना...।
तेव्हा सांग बाळा काय देतसे तु मला, ज्याने मी पावितसे तुजला...।
आजवरी हे नाही कळले माझ्या बाळांना, हेची मोठे दुःख मला...।
परि मी साऱ्याना देतसे माझ्या देहागणी विशाल आभाळमाया...।

बाप्पाच्या त्या कथनातुनी दोन थेंब ओघळले सोंडेवरुनी...।
मग ते दोन मोती मी ही घेतले ओंजळीत भरुनी...।
धन्य झाले मी त्या निस्वार्थ नि निस्सिम प्रेमाची बाप्पाची गोड मुर्ति पाहुनी...।

Comments

Popular posts from this blog

निसर्गाशी मैत्री

प्रेम तुझे नि माझे