विरहाचे गुपीत....
ही शाळा,
ही शाळा ,
अशी ही पाठशाळा...
इथेच आम्ही गायलो, नाचलो,
दंगलो गुंगलो नि प्रफुल्लीत झालो,
हिने स्फुरविले आम्हा प्रगतीकडे झेपावण्यासाठी
अंगीकारुनी अष्टपैलु स्रुष्टी...
इथे कधी गायलो-नाचलो,
तर कधी गंभीर झालो,
कधी आसुसलो होतो,
ज्ञानाने परिपुर्ण होण्यासाठी....
परि आज तो दिन जवळ आला,
जसा लेकिला विरह झाला,
हि खंत लागे मनाला,
तेव्हा जीव अश्रुंनी पाघळला...
दिवस येता येता हि ओंजळ स्म्रुतींनी भरघच्च भरली,
आशेची किरणे पदरात पडली,
जीवनाची नवी वाट सापडली...
असाही अंत असावा अश्रुंना,
हे पाहुनी आज मला,
जीवनाच्या प्रत्येक वळणावरी येणाऱ्या
विरहाचे गुपीत कळले...
Comments
Post a Comment