तु आवडतोस मला कारण... तुझा तो वक्तव्यातला खरेपणा, तुझ्या बोलण्यातला मिश्किलपणा... तुझ ते स्वकियांसाठी असलेले प्रेम, तुझी ती आप्तांना जोडुन ठेवण्याची धडपड , आवडते मला। तुझं ते मित्रांना साथ देण, गरजुंनामायेचा हात देण, भावतेमला। तुझ्या ह्रिदयलहरिंमधे खळखळणारा प्रेमाचा झरा, ओठांवर येत नसले तरि मनात खोलवर असलेले माझ्यावरचे प्रेम, उगाच स्तुतीची सुमने न उधळता, सुधारणांसाठी तु दिलेले मायेचे कडु औषधं, आवडते मला।
Posts
- Get link
- X
- Other Apps
बाबांचा अंश असे जरी मी, जग तु दाखवलेस मला। ते नसताना हयात, निधड्या छातीने घडवलेस मला। आईचे ह्रिदय जरी कोवळे तुझे, बाबांचा कठोरपणा आणलास खरा। आई नि बबांची पात्र उत्तम निभावलीस, नेहेमीच फटके देऊन जवळ केलस मला। मुलगी म्हणुन घडणार केलीस, पदर सांभाळायला शिकवलस। मुलासारखी कमवण्याची जिद्द देउन, खंबीरहि बनवलस। पाया मजबुत करण्यासाठी, शिक्षणाची कास धरलीस। अशास्वत सुखाची नाहि, तर शास्वत सुखाची दार तु उघडलीत। यश म्हणजे केवळ पैसा, हे गणित तु मोडुन काढलस। निरंतर अपयशाला पदक्रांत करुन, यश मिळवण्याच सामरर्थ्य तु दिलस। सुखजन्य परिस्थितीत सगळेच आनंद मिळवतात, तु मला दुःखात नि संघर्षात आनंद शोधायला शिकवल। रात्रीच्या अंधारातही, दिव्याने मिळणारऱ्या उजेडाची सकरात्मकता तु जपुन ठेवलीस। तु आहे माझ्या आयुष्याची शिल्पकार, अनेक जन्मातही नाही फेडु शकणार मी तुझे उपकार। कधी नावं कमवले जगात, तर तुझेच कमवीन मी आई, कारण बाबांनी मला सोडुन जाण्याची , खुपच केली घाई। वडिल केवळ जन्मदाते, आई माझे सर्वस्व, त्याग मुर्ती माझ्या आईपुढे, आहे मी आज क्षमस्व। लक्ष-लक्ष नमन तुला आई, लक्...
- Get link
- X
- Other Apps
पोर्णिमेच्या राती झाले होळीचे सम्मार्जन, दुर्गुणांचे दहन करुनी मन झाले निर्मळ। रुसवे सारे विसरुनी पिवळा रंग उधळला, मैत्रीच्या रंगात द्वेशाला थारा न उरला। गुलाबी उधळण गडद लाल झाली, प्रेमाच्या रंगात स्रुष्टि हि बुडाली। निळयाशार आभाळाखाली हिरवीगार सावली, नवचैतन्याची हवाच जणु पसरली। सोनेरी ती किरणे प्रगती घेउनी आली, पांढऱ्या शुभ्र रंगाने आत्मयाची पवित्रता जपली। होळीच्या ह्या दिवशी जीवन अनेक रंगात रंगले, नि मनात आनंद भरुनी गेले। माझ्याकडुन आपणांस होळीच्या खुप खुप शुभेच्छा। -रोहिणी भुते.
- Get link
- X
- Other Apps
प्रजेचे राज्य, प्रजेचीच सत्ता आठवतोय का कुणाला आज पारतंत्र्याचा पत्ता। भीमाने घेतला भारतीय घटनेचा वसा, देशात रुतला संविधानाचा सुंदर ठसा। संविधानात नियमांची माळ अशी गोवली, प्रजेला त्यांच्या अधिकारांची किल्ली हि गावली। योग्यतेला बळ देवुन प्रजेने प्रधान असा निवडला, हळु हळु भारत माझा विश्वनकाशात उतरला। प्रजासत्ताक देश माझा विश्व नक्किच काबिज करेल, प्रथम स्थान हरेक क्षेत्रात गाजवत छाप आपली नक्किच सोडेल। मायभुमिला त्यागले ज्यांनी ती लेकरे परत येतील, माझ्या भुमितील प्रेम नि सौख्य विश्वात नाहि हे ठासुन सांगतील। तेव्हा आजच्या या प्रजसत्ताक दिनी एक विनंती आहे माझ्या बांधवांना, विश्वास ठेवा आपल्या संविधानावर, नि अभिमान बाळगा भारतीय असल्याचा...जय हिंन्द। -रोहिणी भुते.
- Get link
- X
- Other Apps
समाजात वजन वाढवण्यासाठी, आधी शारिरीक वजन कमी करावं लागत। शब्दांना महत्व यावे म्हणुन, कधी कधी अबोल व्हाव लागतं। यशाची पातळी गाठायला कधी कधी अपयशी व्हावं लागत। आयुष्यात भरभरुन आनंदी होण्यासाठी आधी दुःखी व्हावं लागत। गुलाबाचा सुगंध घ्यायला कधी कधी काट्यांना हाती घ्यावं लागतं। मनमुराद विश्रांती घ्यायला कधी कधी अविश्रांत चालावं लागत। मेहनतीला कमी करण्यासाठी आधी खूप खूप मेहनत करावी लागते। कुणाची कधीतरी आठवण काढायला आधी त्याला विसरावं लागत। सुटकेचा निःश्वास सोडण्यासाठी आधी भरभरुन श्वास घ्यावा लागतो। जीवनातील अर्थपुर्ण अश्रुंना लपवण्यासाठी कधी कधी निअर्थक हसावं लागतं।
- Get link
- X
- Other Apps
🌅पहाट🌄 पहाट म्हणजे पुन्हा नव्याने बहरलेली सोन्याची किरणे, पुन्हा नव्याने पडलेले दवबिंदु, पुन्हा निर्सगाने स्वच्छ केलेला श्वास, पुन्हा कोकिळेच्या स्वरात मुग्ध झालेली भुपाळी। पहाट म्हणजे पुन्हा मनाने धरलेली आस, शुन्यातुन विश्व उभे करु पाहाणारी चैतन्याची ती आरास, पहाट म्हणजे नवी स्वप्न, नवी उम्मेद, अनेक अपयशानंतर यशशिखर गाठणारे ते ब्रिद। पहाट म्हणजे विरहाच्या दाट अंधाराला दुर सारणारी प्रेमाची किरणे, पुन्हा मनात वाजणारा प्रितीचा राग, नव्याने हवासा वाटणारा प्रिय व्यक्तिचा सहवास, केस सावरता सावरता, सावरलेले ते प्रेम। पहाट म्हणजे भुकंपाने उदध्वस्त झालेल्या धरणीवर फुटलेले नवे अंकुर, निराशेने खचलेल्या धरणीची स्थिर होण्याची ती धडपड, पुन्हा गवसलेली नवचेतना, प्रकाशवलयांनी तेजोमय झालेल्या आशा नि अंधारासोबत विरुन गेलेल्या निराशा।
- Get link
- X
- Other Apps
।। ईश्वक्रुपा ।। मी ईश्वराला मागीतले बळ, त्याने दिधला संघर्ष सर्वकाळ। मी ईश्वराला मागीतली बुद्धि, त्याने दिधली प्रश्नपत्रिका आव्रुत्ती। मी मागीतले धन तयाला, त्याने दिले काम मला कमवायला। धाडस मागता ईश्वराने, मला अग्नीदिव्य दिलेत ओलांडायला। मी ईश्वराला मागीतले प्रेम नि माया, त्याने दिधले हिन-दीन सावराया। मी ईश्वराला मागीतले यश, त्याने दिल्या अगणीत संधी मिळवाया सुयश। जे जे मागीतले मी ईश्वरा,ते न दिले त्याने मजसी, परि केले सार्थ माझ्या प्रत्येक इच्छेसी। - रोहिणी भुते.
- Get link
- X
- Other Apps
नाते बहिण भावाचे भाऊ म्हणजे काळजीवखहू सरकार, ह्यावर सोपवून द्यायचा असतो सगळा भार... भाऊ म्हणजे भांडण तंटा नि दे मार.. पण भाऊ महणजे फुल्ल शेअरिंग.. त्याचा शर्ट तिचा , नि तिचे जँकेट तो धोपपणार... बहिणीने चाहा करावा म्हणुन तो तिला रिश्वत देणार आइस्क्रिमची... तर त्याने कपडे नीट ठेवावे म्हणुन ती भुल घालणार त्याला गोडाची.. बहिण कितीही असु देत बंदर, पण भावाला मात्र नेहेमीच दिसते ती अतिसुंदर... भावाला आवडली कुणी स्वप्नससुंदरी, तर तो पटवणार बहिणीलाच आधी... त्यानंतर सारे कुटुंब सहज होणार राजी... कचाकचा भांडणखरा हा भाऊ, बहिणीच्या लग्नात मात्र वेगळखच दिसतो.... वरवर रुबाब दाखवत असला तरि मनाने मात्र खचतो... बहिणीला हि ह्या भावाचा खांदा सुटत नाही, नि भावाचे अश्रु देखील काहि केल्या आटत नाही... असे हे सुरेख बंधन, एकमेकांना सदैव मायेची साद घालते.. नि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, नाविन्याने पुन्हा तग धरते..
- Get link
- X
- Other Apps
गणपती बाप्पाचे गुज... एके दिनी रात्र समयी विश्व निजले असता, मी केले बाप्पाशी गुज जरा...। आपुले दुःख सांगुनी विश्व भंडावुनी सोडे त्याला, मग ठरविले आपणही जाणुनी घ्याव्या बाप्पाच्या दुःख लहरा...। बाप्पाला विचारता त्याचे दुःख सत्वरी, बोलु लागला तो मधुर स्वरी..। काय बोलु बाळा तुला, जगी चालणारऱ्या भक्तिचा नि त्यासाठी चाललेल्या हिशेबाचा विट आला मला....। कुणी परिक्षेतील यशासाठी मोदक अर्पितो मला, तर कुणी नोकरी-धंद्यासाठी सोन्याच्या मुकुटाची लाच देऊ पाही मला, कुणी म्हणे बाळ खेळल अंगणी तर आणेल दहा दिनी माझ्या घरा, कुणी जोडीदार मगुनी भांडावुनी सोडतसे माझ्या जीवाला, कुणी तर रोज एक नाणे मज समोरी ठेवुनी त्याच्या रक्षणाची हमी मागतसे मला....। काय सांगावे माझ्या या भाबड्या बाळांना, मोदकाचा सुगंध जरी मला, घास मिळतो तयांना..। सोन्याचा मुकुट जरि मला, सम्रुद्धि मिळतसे त्यांना..। दश दिनी मी असता घरी, दुःखताप माझ्या चरणी नि आनंद सारा तयांना..। रक्षण मी करतसे जरी , रुक्याची ती सारी जमा -पुंजी त्याना...। तेव्हा सांग बाळा काय देतसे तु मला, ज्याने मी पावितसे तु...
- Get link
- X
- Other Apps
Everyone says that a person is a student and life is a best teacher of his life. But there are people who are persons and become our life by teaching us many good lessons in our life. They give directions to us in every twist and turns of life. There are 2 such incredible ladies in my life. My mother and my teacher Dr. Shital Chiddarwar....both are my life. One is very moderately educated(my mother), has solutions to every problem as she persue lots of wisdom which she gained from life... The other lady is simply outstanding (My teacher), she is very highly educated and have self enlightenment which she spread towards her students ....she is not just a teacher but a mother of her student.... Today on the occasion of Teachers day, I just want to express my love and respect to both of them. The beautiful shape of my life is only because of these two great ladies. I want to thank both of you for being my teacher and my life.😇😊
- Get link
- X
- Other Apps
प्रेम काय असतं, ते अजुनही मला उमजत नाही..😍 कुणाच्या भेटीची ओढ असणं म्हणजे प्रेम?🤗 की त्याला न भेटताही तो मनात बसणं नि सगळीकडे दिसणं म्हणजे प्रेम? कुणाचा स्पर्श हवा हवासा वाटणं म्हणजे प्रेम?😘 की स्पर्श न होता ही त्याची जाणीव मनात असणं म्हणजे प्रेम?😇 तो कधीच दुसऱ्याचा होऊ नये, असं वाटणं म्हणजे प्रेम? की त्याला आवडलेली व्यक्ती मिळावी हि भावना म्हणजे प्रेम?🌹 कुणाची साथ केवळ आपल्याला लाभावी, असं वाटणं म्हणजे प्रेम? की आपण त्याला जन्मभर साथ करावी, हि कामना बाळगणं म्हणजे प्रेम?💑 जरा अवघड आहे, दोन्ही रंग वेगळे आहेत... पण जर ह्रिदयात कुणासाठी खास जागा असेल तर रंग आणि पद्धत कितीही वेगळी का असेना,..ते ..प्रेमच आहे...💓अगदी मनापासुन केलेलं प्रेम...💘
- Get link
- X
- Other Apps
मी आता आयुष्य enjoy करायच ठरवलयं🌼🌺🌿🌷 भल्या मोठ्या पावसात भिजुन आनंद मिळवण्यापेक्षा,🌧️ लहान लहान तुषार सरित भिजायचं ठरवलयं,💧 मी आयुष्य enjoy करायच ठरवलयं.. Highway सारख्या रुंद रस्त्याने तर सगळेच चालतात,🛣️ मी मात्र अरुंद अश्या त्या गल्लीतुन वाट काढायचं ठरवलयं, मी आयुष्य enjoy करायच ठरवलयं.. पाऊस पडून गेल्यावर चिखल तर होणारच, नि अंगावरही उरणारं, पण मी raincoat घालुन बिंधास्त चिखल अंगावर घ्यायचं ठरवलयं,☔️ मी आता आयुष्य enjoy करायच ठरवलयं.. सतत सुखात असतांना तर कुणीही धुंद होईल,🎉 मी मात्र छोट्या छोट्या क्षणांमधेच बेधुंद व्हायचं ठरवलयं,🎊🎇 मी हे सुंदर आयुष्य खुप खुप enjoy करायच नि ते अधिकचं सुंदर बनवायचं ठरवलयं..😀😊
- Get link
- X
- Other Apps
मन हे भिजले चिंब चिंब अश्रुंनी, का ते कळेना, काळ हा सरेना। ओढ लागे मनाला सोनेरी प्रभातीची घेऊनी येईल गारवा, अश्या त्या सुखाची। का ती तुटली नती, का ते तुटले बंध, ज्यात दडलेला होता जिव्हाळ्याचा निशीगंध। मन गेले गुंतुनी शंका-कुशंकांनी, खरंच लाभेल का त्यांचीही अधिराणी, जी देईल मनःशांती नि करेल शंका समाधान। मग तेव्हा पुन्हा भिजुनी जाईल हे मन, मायेच्या ओलाव्याने, भारावुनी टिपुस गाळील ते , नि नाचेल मोदाच्या नादाने।
- Get link
- X
- Other Apps
काट्यांच एक बरं असतं, कधीतरी टोचणार माहित असतं, शब्दांचे खेळ मात्र निराळे, कधी केव्हा बोचणार माहित नसतं। --------------------------------------------------------- कसे हे नियतीचे असे ऊन सावलीचे खेळ काळ सोकावला होता अन् आली होती वेळ। --------------------------------------------------------- दे जन्म मला या मात्रुभुमीच्या पोटी पुन्हा पुन्हा मरण्यासाठी। --------------------------------------------------------- काय बोलु आता मी शब्द माझे संपु लागले, तुझ्या अबोल्याने मनाचे बांध हे तुटू लागले। कळेल का तुला कधी हि मुकी स्पंदने म्हणुनी अविश्वासाच्या नावेत डोलु लागले। पण आत्म्याने दिलेल्या कौलाने परत ते स्थिरावू लागले। ---------------------------------------------------------------------
- Get link
- X
- Other Apps
एक आहे माझा सखा.. धारदार त्याचे नाक, पाणीदार त्याची नजर, रुबाबदार त्याचा डौल, आहे तो खुपच सुडौल.. निखळ त्याचे हास्य, करी तो साऱ्यांशी मधुर भाष्य, वाणी त्याची कडक, परि देत असे म ऊ सर उत्तर बेधडक.. आहे हे आई-बापाचे आग्याकारी मुल, कधीच मित्रांना देत नसे भुल, आता बायको मिळावी म्हणुनी चालली आहे चुल चुल, स्वप्न रंगवत असे तो तिचे मधुर... साऱ्या सख्या सवंगड्यांना करित असे विनवणी, बघाना मला पण माझ्या स्वप्नातली राणी, त्याची ती प्रेमाची निरागस ओढ पाहुनी, निघाले मित्र मंडळ आता शोध मोहिमेवरी... ही शोध मोहीम फत्ते होणार तरि कधी.. हा यक्ष प्रश्न पडलासे साऱ्या जगती, करितसे ईश्वर चरणी हिच प्रार्थना, लवकरी लाभु दे माझ्या सख्याला त्याची जीवनसंगीनी..
- Get link
- X
- Other Apps
विरहाचे गुपीत.... ही शाळा, ही शाळा , अशी ही पाठशाळा... इथेच आम्ही गायलो, नाचलो, दंगलो गुंगलो नि प्रफुल्लीत झालो, हिने स्फुरविले आम्हा प्रगतीकडे झेपावण्यासाठी अंगीकारुनी अष्टपैलु स्रुष्टी... इथे कधी गायलो-नाचलो, तर कधी गंभीर झालो, कधी आसुसलो होतो, ज्ञानाने परिपुर्ण होण्यासाठी.... परि आज तो दिन जवळ आला, जसा लेकिला विरह झाला, हि खंत लागे मनाला, तेव्हा जीव अश्रुंनी पाघळला... दिवस येता येता हि ओंजळ स्म्रुतींनी भरघच्च भरली, आशेची किरणे पदरात पडली, जीवनाची नवी वाट सापडली... असाही अंत असावा अश्रुंना, हे पाहुनी आज मला, जीवनाच्या प्रत्येक वळणावरी येणाऱ्या विरहाचे गुपीत कळले...
- Get link
- X
- Other Apps
लगता है, तु मुझे दुर से ही सही मगर , देखे जरुर। लगता है, पता ना चले मुझे, मगर मै तेरे ख्वाबो ख्यालो मे हमेशा बनी रहु। लगता है, तुझे मेरे याद करनेपर हिचकिया लगे, जो मेरा नाम लेते ही थम जाए। लगता है, तेरे रात के हर सपने मे मै तेरे साथ रहु। लगता है, जब तु आइनेमे देखे तो तेरी आँखो मे, तुझे मै नजर आँऊ। लगता है, मेरे खुशी से तु हस पड़े, और मेरी चोट का तुम्हे एहेसास हो। ऐसा ये हमारा प्यार, बड़ाही खास हो।