प्रजेचे राज्य, प्रजेचीच सत्ता
आठवतोय का कुणाला आज पारतंत्र्याचा पत्ता।
भीमाने घेतला भारतीय घटनेचा वसा,
देशात रुतला संविधानाचा सुंदर ठसा।
संविधानात नियमांची माळ अशी गोवली,
प्रजेला त्यांच्या अधिकारांची किल्ली हि गावली।
योग्यतेला बळ देवुन प्रजेने प्रधान असा निवडला,
हळु हळु भारत माझा विश्वनकाशात उतरला।
प्रजासत्ताक देश माझा विश्व नक्किच काबिज करेल,
प्रथम स्थान हरेक क्षेत्रात गाजवत छाप आपली नक्किच सोडेल।
मायभुमिला त्यागले ज्यांनी ती लेकरे परत येतील,
माझ्या भुमितील प्रेम नि सौख्य विश्वात नाहि हे ठासुन सांगतील।
तेव्हा आजच्या या प्रजसत्ताक दिनी एक विनंती आहे माझ्या बांधवांना, विश्वास ठेवा आपल्या संविधानावर, नि अभिमान बाळगा भारतीय असल्याचा...जय हिंन्द।
-रोहिणी भुते.
Comments
Post a Comment