।। ईश्वक्रुपा ।।
मी ईश्वराला मागीतले बळ,
त्याने दिधला संघर्ष सर्वकाळ।
मी ईश्वराला मागीतली बुद्धि,
त्याने दिधली प्रश्नपत्रिका आव्रुत्ती।
मी मागीतले धन तयाला,
त्याने दिले काम मला कमवायला।
धाडस मागता ईश्वराने,
मला अग्नीदिव्य दिलेत ओलांडायला।
मी ईश्वराला मागीतले प्रेम नि माया,
त्याने दिधले हिन-दीन सावराया।
मी ईश्वराला मागीतले यश,
त्याने दिल्या अगणीत संधी मिळवाया सुयश।
जे जे मागीतले मी ईश्वरा,ते न दिले त्याने मजसी,
परि केले सार्थ माझ्या प्रत्येक इच्छेसी।
- रोहिणी भुते.
Comments
Post a Comment