तु आवडतोस मला कारण...
तुझा तो वक्तव्यातला खरेपणा,
तुझ्या बोलण्यातला मिश्किलपणा...
तुझ ते स्वकियांसाठी असलेले प्रेम,
तुझी ती आप्तांना जोडुन ठेवण्याची धडपड , आवडते मला।
तुझं ते मित्रांना साथ देण,
गरजुंनामायेचा हात देण, भावतेमला।
तुझ्या ह्रिदयलहरिंमधे खळखळणारा प्रेमाचा झरा,
ओठांवर येत नसले तरि मनात खोलवर असलेले माझ्यावरचे प्रेम,
उगाच स्तुतीची सुमने न उधळता,
सुधारणांसाठी तु दिलेले मायेचे कडु औषधं, आवडते मला।
Comments
Post a Comment