Posts

I do not have command over a language

 I do not have command over a language, But I use it to give all commands the same. I don't have enough words to craft a poem, But I use enough to share my thoughts by name. English is not native to me, it's true, But it’s the bridge through which my voice breaks through. I may not have the perfect words to say, But what I feel, I’ll find a way. Though my phrases sometimes falter, In this language, I still alter, What’s in my heart, so you can see, The thoughts that rise, the soul of me. -Rohini Bhute Gawali 

शोध बाबांचा

 बाबा कधी पाहिले नव्हते जीवनातले हे सुख राहिले होते कधी माझ्या बाबांना मी मामात तर कधी काकात शोधत होते कधी आजोबांत तर कधी शेजारच्या काकात शोधत होते लग्नानंतर तर सआसर्यांमधे शोधत होते पण शोध काही संपला नाही... मग बाळाने माझ्या एके दिवशी दाखवुन दिले  बाबा कसे असतात... आणि नकळतपणे नवर्यातच मला माझे बाबा दिसले. रोहिणी भुते गवळी

Modified Newton's Law

 To every action there is equal and opposite reaction but if the reaction is stopped it increases the impulse of the reaction...so it's always better to express the reaction at the very moment... -Rohini Bhute Gawali

प्रेम तुझे नि माझे

 तुझ्यासाठी प्रेम म्हणजे अंगाला झालेला स्पर्श.... माझ्यासाठी प्रेम म्हणजे हृदयात उठलेली स्पंदनं। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे हातात घेतलेला हात.... माझ्यासाठी प्रेम म्हणजे जन्मभराची साथ। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सतत व्यक्त होणारे बोल... माझ्यासाठी प्रेम म्हणजे नजरेने व्यक्त झालेले अबोल। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सौंदर्याचं आकर्षण.. माझ्यासाठी प्रेम म्हणजे दोघांचं भावनिक संकर्षण। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सतत केलेली तडजोड, माझ्यासाठी प्रेम म्हणजे मनापासुन जुळवलेले असे विजोड। -रोहिणी भुते गवळी

विठ्ठल साधावा

नको रडू पंढरीची वारी चुकली म्हणुनी.. विठ्ठलाला बघ जरा अंतःकरण उघडुनी.. तो नाहि पंढरपुरी, तो नाही चंद्रभागा तिरी.. तो आहे चराचरी त्यासी ओळख रे वेड्या तु सत्वरी । तु घे विठठ्ठलाची ध्यानमुद्रा नि हो मग्न.. बघ होतंय कि नाही सारे विश्व तुला संलग्न.. शिकवी आपणास तो, तुझेच सारे दीन ते बंधु.. रंग नाही गोरा म्हणुनि नको त्यांसी तु निंदु। अर्पियली नाही तुळशी म्हणुनि, होऊ नकोस तु दुःखी.. कर तुळशींची पेरणी , नि होउ दे प्राणवायुत वृद्धि.. तुझा विठ्ठल बघ त्वरेने तुझ्यासाठी धावेल वैकुंठाचे सुख तुला धर्तीवरच गावेल। चंदनाचा टिळा जसा जप तुझे चारित्र्य.. गरजुंच्या हाकेशी धावुनी जप विठ्ठलाचे मातृत्व.. सत्याची कास सोडु नकोस बेइमानिचा त्रास होउ नकोस.. सद्विचारांच्या गजरात भेट तु विठ्ठलाला प्रतिदिनी होई बघ आषाढीचा पर्व  साजरा। असाच जीवनाच्या किर्तनात आम्हास विठ्ठल भेटावा, नव्हे विठ्ठल साधावा। जय जय रामकृष्ण हरी। ‌जय जय रामकृष्ण हरी। -रोहिणी भुते गवळी

मुल्यांकन

  कधीतरी मुलींचं मुल्यांकन  तिच्या गुणांनी करायला शिका की हो.. नसेल ती खूप सुंदर अप्सरा नसेल ती परि लावण्या, कधीतरी तिच्या कष्टांच्या पराकाष्टेचा  अभिमान बाळगायला शिका की हो... नसेल ती कोमल कळी नसेल साजुक सोनसळी कधीतरी तिच्यातल्या मर्दानीला सलाम ठोकायला शिका की हो... नसेल तिचा रंग गोरापान नसेल तिचे डोळे मासळी सारखे छान कधीतरी तिच्या त्या प्रेमळ नि सच्चा मनाला साद द्यायला शिका की हो... नसेल ती घरकामात अव्वल नसेल ती स्वयंपाकात सुगरण कधीतरी तुमच्या मुलींनाच नाही तर  मुलांनाही घरकामात हातभार लावायला शिकवा की हो... पुस्तकात शिकवण्यापुर्ती नव्हे तर खऱ्या आयुष्यात मुलींना समान दर्जा  आता तरी..द्यायला शिका की हो.... - रोहिणी भुते गवळी

नुतनवर्षाभिनंदन

 बाह्य प्रगतीचे स्वप्न रेखीले कलामांनी २०२० चे पर्मेश्वराने साकारिले ते आंतरिक प्रगतीने। करुणा नसणरऱ्या कोरोनाचा शिरकाव झाला, नि माणसांचा स्मशानाकडे लोंढा उठला। भयाचे साम्राज्य  सर्वत्र पसरले, त्याने मानवाला  घरातच पिंजले। स्वच्छता, स्वास्थ्य नि स्वदेशीला जाग आली, नात्यांचा दुरावा संपुनी जीवांची ओढ वाढली। जनावरांनाही मिळाला कही काळ मोकाट पसारा, वृक्षानी घेतला थोडा श्वास मोकळा। जुन्या वर्षाने खरा धडा शिकविला उन्मत्त मानवाचा माजही  उतरवला। या जुन्या वर्षाच्या गर्भातुन अंकुरले मग नवे वर्ष बाराचा ठोका चुकताच मनी भरला आनंद नि हर्ष। चला मांडुया आता  आनंदाचा डाव, जुन्या वर्षातील अनुभवांच्या साथीनं जपुया हि सुखांची ठेव। - रोहिणी भुते गवळी

इवलेसे स्वप्न

  बस इवलेसे स्वप्न आहे.. दीनांना उत्पन्नाचे साधन द्यावे,  नि आत्मतृप्तीचे गोड फळ चाखावे ! बस इवलेसे स्वप्न आहे.. ज्ञानाचा उजेड द्यावा,  नि बुद्धिची कवाडे उघडावी! बस इवलेसे स्वप्न आहे.. अनाथांचा हात धरावा, नि अनेकांच्या हृदयाची साद व्हावी! बस इवलेसे स्वप्न आहे.. जमेल त्याचे डोळे पुसावे,  नि माझ्या गाली हास्य बाहरावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. माणसाला माणूसकीने जोडावे, नि सारे जग  आनंदी व्हावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. अजुनही थोड्या शिल्लक असलेल्या मि-पणाचा नाश व्हावा,  नि प्रेमाचे झरे ओसंडावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. स्वत्वातिल ईश्वरास ओळखावे, नि या जन्मिचे सार्थक व्हावे! बस इवलेसे स्वप्न आहे..माझे! - रोहिणी भुते गवळी.

निसर्गाशी मैत्री

चला करुया निसर्गाची परतफेड, घालुया पुन्हा नव्याने सौंख्याची मुहुर्तमेढ‌ ! लवलवत्या पानावर झुळ झुळेल वारा, कोसळतिल भारावुनी मग श्रावणाच्या धारा! गारव्यात शुभ्र तर श्रावणात हिरवी साडी,  नेसुनी नटेल हि धरणी! नाही करावी लागणार मेघराजाला मग,  यज्ञ्याची मनधरणी! नाहि लागणार शुद्ध श्वासालाही ,  ऑक्सिजनचा मास्क! झऱ्याच्या त्या गोड‌ पाण्याने मिळेल,  तृष्णेला अवकाश! चला तर माझ्या बांधवांनो,  करुया जंगलाची पेरणी! परत देवूया धरणीच्या जिवांना,  त्यांची हक्काची धरणी! चला करुया नैसर्गिक जिन्नसांची निर्मिती, समतोल साधुया आता सृष्टिच्या संगती! - रोहिणी भुते गवळी.
तु आवडतोस मला कारण... तुझा तो वक्तव्यातला खरेपणा, तुझ्या बोलण्यातला मिश्किलपणा... तुझ ते स्वकियांसाठी असलेले प्रेम, तुझी ती आप्तांना जोडुन ठेवण्याची धडपड , आवडते मला। तुझं ते मित्रांना साथ देण,  गरजुंनामायेचा हात देण, भावतेमला। तुझ्या ह्रिदयलहरिंमधे खळखळणारा  प्रेमाचा झरा, ओठांवर येत नसले तरि मनात खोलवर असलेले माझ्यावरचे प्रेम, उगाच स्तुतीची सुमने न उधळता,  सुधारणांसाठी तु दिलेले मायेचे कडु औषधं, आवडते मला।
बाबांचा अंश असे जरी मी, जग तु दाखवलेस मला। ते नसताना हयात, निधड्या छातीने घडवलेस मला। आईचे ह्रिदय जरी कोवळे तुझे, बाबांचा कठोरपणा आणलास खरा। आई नि बबांची पात्र उत्तम निभावलीस, नेहेमीच फटके देऊन जवळ केलस मला। मुलगी म्हणुन घडणार केलीस, पदर सांभाळायला शिकवलस। मुलासारखी  कमवण्याची जिद्द देउन, खंबीरहि बनवलस। पाया मजबुत करण्यासाठी, शिक्षणाची कास धरलीस। अशास्वत सुखाची नाहि, तर शास्वत सुखाची दार तु उघडलीत। यश म्हणजे केवळ पैसा, हे गणित तु मोडुन काढलस। निरंतर अपयशाला पदक्रांत करुन, यश मिळवण्याच सामरर्थ्य तु दिलस। सुखजन्य परिस्थितीत सगळेच आनंद मिळवतात, तु मला दुःखात नि संघर्षात आनंद शोधायला शिकवल। रात्रीच्या अंधारातही, दिव्याने मिळणारऱ्या उजेडाची सकरात्मकता तु जपुन ठेवलीस। तु आहे माझ्या आयुष्याची शिल्पकार, अनेक जन्मातही नाही फेडु शकणार मी तुझे उपकार। कधी नावं कमवले जगात, तर तुझेच कमवीन मी आई, कारण बाबांनी मला सोडुन जाण्याची , खुपच केली घाई। वडिल केवळ जन्मदाते, आई माझे सर्वस्व, त्याग मुर्ती माझ्या आईपुढे, आहे मी आज क्षमस्व। लक्ष-लक्ष नमन तुला आई, लक्ष-लक
पोर्णिमेच्या राती झाले होळीचे सम्मार्जन, दुर्गुणांचे दहन करुनी मन झाले निर्मळ। रुसवे सारे विसरुनी पिवळा रंग उधळला, मैत्रीच्या रंगात द्वेशाला थारा न उरला। गुलाबी उधळण गडद लाल झाली, प्रेमाच्या रंगात स्रुष्टि हि बुडाली। निळयाशार आभाळाखाली हिरवीगार सावली, नवचैतन्याची हवाच जणु पसरली। सोनेरी ती किरणे प्रगती घेउनी आली, पांढऱ्या शुभ्र रंगाने आत्मयाची पवित्रता जपली। होळीच्या ह्या दिवशी जीवन अनेक रंगात रंगले, नि मनात आनंद भरुनी गेले। माझ्याकडुन आपणांस होळीच्या खुप खुप शुभेच्छा। -रोहिणी भुते.
प्रजेचे राज्य, प्रजेचीच सत्ता आठवतोय का कुणाला आज पारतंत्र्याचा पत्ता। भीमाने घेतला भारतीय घटनेचा वसा, देशात रुतला संविधानाचा सुंदर ठसा। संविधानात नियमांची माळ अशी गोवली, प्रजेला त्यांच्या अधिकारांची किल्ली हि गावली। योग्यतेला बळ देवुन प्रजेने प्रधान असा निवडला, हळु हळु भारत माझा विश्वनकाशात उतरला। प्रजासत्ताक देश माझा विश्व नक्किच काबिज करेल, प्रथम स्थान हरेक क्षेत्रात गाजवत छाप आपली नक्किच सोडेल। मायभुमिला त्यागले ज्यांनी ती लेकरे परत येतील, माझ्या भुमितील प्रेम नि सौख्य विश्वात नाहि हे ठासुन सांगतील। तेव्हा आजच्या या प्रजसत्ताक दिनी एक विनंती आहे माझ्या बांधवांना, विश्वास ठेवा आपल्या संविधानावर, नि अभिमान बाळगा भारतीय असल्याचा...जय हिंन्द। -रोहिणी भुते.
तिळाचा कडवटपणा, गुळाचा गोडवा दुःखाच्या कडुपणाला, प्रेमाच्या गोडव्याने पळवा। निराशेचे मळभ साराया चैतन्याची संक्रांत व्हावी, आयुष्याच्या निळ्या गगनात पतंगीने उंच भरारी घ्यावी। अंतर-आत्म्याला हळदी-कुंकवाचा श्र्ऋंगार करावा, नि सत्याचा आनंद ओटीभरुन लुटावा। -रोहिणी भुते।
समाजात वजन वाढवण्यासाठी, आधी शारिरीक वजन कमी करावं लागत। शब्दांना महत्व यावे म्हणुन, कधी कधी अबोल व्हाव लागतं। यशाची पातळी गाठायला कधी कधी  अपयशी व्हावं लागत। आयुष्यात भरभरुन आनंदी होण्यासाठी  आधी दुःखी व्हावं लागत। गुलाबाचा सुगंध घ्यायला कधी कधी काट्यांना हाती घ्यावं लागतं। मनमुराद विश्रांती घ्यायला कधी कधी अविश्रांत चालावं लागत। मेहनतीला कमी करण्यासाठी आधी खूप खूप मेहनत करावी लागते। कुणाची कधीतरी आठवण काढायला आधी त्याला विसरावं लागत। सुटकेचा निःश्वास सोडण्यासाठी आधी भरभरुन श्वास घ्यावा लागतो। जीवनातील अर्थपुर्ण अश्रुंना लपवण्यासाठी  कधी कधी निअर्थक हसावं लागतं।
🌅पहाट🌄 पहाट म्हणजे पुन्हा नव्याने बहरलेली सोन्याची किरणे, पुन्हा नव्याने पडलेले दवबिंदु,  पुन्हा निर्सगाने स्वच्छ केलेला श्वास, पुन्हा कोकिळेच्या स्वरात मुग्ध झालेली भुपाळी। पहाट म्हणजे पुन्हा मनाने धरलेली आस, शुन्यातुन विश्व उभे करु पाहाणारी चैतन्याची ती आरास, पहाट म्हणजे नवी स्वप्न, नवी उम्मेद, अनेक अपयशानंतर यशशिखर गाठणारे ते ब्रिद। पहाट म्हणजे विरहाच्या दाट अंधाराला दुर सारणारी प्रेमाची किरणे, पुन्हा मनात वाजणारा प्रितीचा राग,  नव्याने हवासा वाटणारा प्रिय व्यक्तिचा सहवास, केस सावरता सावरता, सावरलेले ते प्रेम। पहाट म्हणजे भुकंपाने उदध्वस्त झालेल्या धरणीवर फुटलेले नवे अंकुर, निराशेने खचलेल्या धरणीची स्थिर होण्याची ती धडपड, पुन्हा गवसलेली नवचेतना, प्रकाशवलयांनी तेजोमय झालेल्या आशा नि अंधारासोबत विरुन गेलेल्या निराशा।
।। ईश्वक्रुपा ।। मी ईश्वराला  मागीतले बळ,  त्याने दिधला संघर्ष सर्वकाळ। मी ईश्वराला  मागीतली बुद्धि,  त्याने दिधली प्रश्नपत्रिका आव्रुत्ती। मी मागीतले धन तयाला, त्याने दिले काम मला कमवायला। धाडस मागता ईश्वराने,  मला अग्नीदिव्य दिलेत ओलांडायला। मी ईश्वराला मागीतले प्रेम नि माया,  त्याने दिधले हिन-दीन  सावराया। मी ईश्वराला मागीतले यश,  त्याने  दिल्या अगणीत संधी मिळवाया सुयश। जे जे मागीतले मी ईश्वरा,ते न दिले त्याने मजसी, परि केले सार्थ माझ्या प्रत्येक इच्छेसी। - रोहिणी भुते.
नाते बहिण भावाचे भाऊ म्हणजे काळजीवखहू सरकार,  ह्यावर सोपवून द्यायचा असतो सगळा भार... भाऊ म्हणजे भांडण तंटा नि दे मार.. पण भाऊ महणजे फुल्ल शेअरिंग.. त्याचा शर्ट तिचा , नि तिचे जँकेट तो धोपपणार... बहिणीने चाहा करावा म्हणुन तो तिला रिश्वत देणार आइस्क्रिमची... तर त्याने कपडे नीट ठेवावे म्हणुन ती भुल घालणार त्याला  गोडाची.. बहिण कितीही असु देत बंदर,  पण भावाला मात्र नेहेमीच दिसते ती अतिसुंदर... भावाला आवडली कुणी स्वप्नससुंदरी, तर तो पटवणार बहिणीलाच आधी... त्यानंतर सारे कुटुंब सहज होणार राजी... कचाकचा भांडणखरा हा भाऊ,  बहिणीच्या लग्नात मात्र वेगळखच दिसतो.... वरवर रुबाब दाखवत असला तरि मनाने मात्र खचतो... बहिणीला हि ह्या भावाचा खांदा सुटत नाही,  नि भावाचे अश्रु देखील काहि केल्या आटत नाही... असे हे सुरेख बंधन, एकमेकांना सदैव मायेची साद घालते.. नि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, नाविन्याने पुन्हा तग धरते..
गणपती बाप्पाचे गुज... एके दिनी रात्र समयी विश्व निजले असता, मी केले बाप्पाशी गुज जरा...। आपुले दुःख सांगुनी विश्व भंडावुनी सोडे त्याला, मग ठरविले आपणही जाणुनी घ्याव्या बाप्पाच्या दुःख लहरा...। बाप्पाला विचारता त्याचे दुःख सत्वरी, बोलु लागला तो मधुर स्वरी..। काय बोलु बाळा तुला, जगी चालणारऱ्या भक्तिचा नि त्यासाठी चाललेल्या हिशेबाचा  विट आला मला....। कुणी परिक्षेतील यशासाठी मोदक अर्पितो मला, तर कुणी नोकरी-धंद्यासाठी सोन्याच्या मुकुटाची लाच देऊ पाही मला, कुणी म्हणे बाळ खेळल अंगणी तर आणेल दहा दिनी माझ्या घरा, कुणी जोडीदार मगुनी भांडावुनी सोडतसे माझ्या जीवाला, कुणी तर रोज एक नाणे मज समोरी ठेवुनी त्याच्या रक्षणाची हमी मागतसे मला....। काय सांगावे माझ्या या भाबड्या बाळांना, मोदकाचा सुगंध जरी मला, घास मिळतो तयांना..। सोन्याचा मुकुट जरि मला, सम्रुद्धि मिळतसे त्यांना..। दश दिनी मी असता घरी, दुःखताप माझ्या चरणी नि आनंद सारा तयांना..। रक्षण मी करतसे जरी , रुक्याची ती सारी जमा -पुंजी त्याना...। तेव्हा सांग बाळा काय देतसे तु मला, ज्याने मी पावितसे तुजला.
Health is wealth For toung's taste,  we are eating waste.. Making diseases as our guest, Doctors then suggests us health tests, It makes money as a waste... Therefore homely food is the best😋😂