नुतनवर्षाभिनंदन
बाह्य प्रगतीचे स्वप्न रेखीले
कलामांनी २०२० चे
पर्मेश्वराने साकारिले ते
आंतरिक प्रगतीने।
करुणा नसणरऱ्या कोरोनाचा
शिरकाव झाला,
नि माणसांचा स्मशानाकडे
लोंढा उठला।
भयाचे साम्राज्य
सर्वत्र पसरले,
त्याने मानवाला
घरातच पिंजले।
स्वच्छता, स्वास्थ्य नि स्वदेशीला
जाग आली,
नात्यांचा दुरावा संपुनी
जीवांची ओढ वाढली।
जनावरांनाही मिळाला
कही काळ मोकाट पसारा,
वृक्षानी घेतला थोडा
श्वास मोकळा।
जुन्या वर्षाने खरा
धडा शिकविला
उन्मत्त मानवाचा माजही
उतरवला।
या जुन्या वर्षाच्या गर्भातुन
अंकुरले मग नवे वर्ष
बाराचा ठोका चुकताच
मनी भरला आनंद नि हर्ष।
चला मांडुया आता
आनंदाचा डाव,
जुन्या वर्षातील अनुभवांच्या
साथीनं जपुया हि सुखांची ठेव।
- रोहिणी भुते गवळी
Comments
Post a Comment