इवलेसे स्वप्न
बस इवलेसे स्वप्न आहे..
दीनांना उत्पन्नाचे साधन द्यावे,
नि आत्मतृप्तीचे गोड फळ चाखावे !
बस इवलेसे स्वप्न आहे..
ज्ञानाचा उजेड द्यावा,
नि बुद्धिची कवाडे उघडावी!
बस इवलेसे स्वप्न आहे..
अनाथांचा हात धरावा,
नि अनेकांच्या हृदयाची साद व्हावी!
बस इवलेसे स्वप्न आहे..
जमेल त्याचे डोळे पुसावे,
नि माझ्या गाली हास्य बाहरावे!
बस इवलेसे स्वप्न आहे..
माणसाला माणूसकीने जोडावे,
नि सारे जग आनंदी व्हावे!
बस इवलेसे स्वप्न आहे..
अजुनही थोड्या शिल्लक असलेल्या मि-पणाचा नाश व्हावा,
नि प्रेमाचे झरे ओसंडावे!
बस इवलेसे स्वप्न आहे..
स्वत्वातिल ईश्वरास ओळखावे,
नि या जन्मिचे सार्थक व्हावे!
बस इवलेसे स्वप्न आहे..माझे!
- रोहिणी भुते गवळी.
Comments
Post a Comment