Posts

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

 आंब्याच्या पनानी दार सजले सुंदर, प्रणाना श्वास मिळाले दीर्घकाळ निरन्तर... आपट्याच्या पानाला ह्रदयाचा आकार, सोन्यासारखे पान दूर करी  हृदयाचे विकार... चौरस्त्याची रांगोळी रेखियाली रंगानी, जीवनात केली त्यांनी सौभाग्याची भरणी... अवजारांची पूजा,  वाहनांना हार,  यंत्रांनी नि दळणवळनानेच तर लावला आपल्या प्रगतीला हातभार... दशमीच्या दिवशी देवी सीमोल्लंघनाला निघाली, असुरारुपी रोगांच्या वधाने आरोग्याचं देणं ती देऊन गेली... चला करूया साष्टांग दंडवत तिजलां, दसऱ्याचा सण हा हार्दिक शुभेच्छानी सजला.... -Rohini Bhute Gawali 

I do not have command over a language

 I do not have command over a language, But I use it to give all commands the same. I don't have enough words to craft a poem, But I use enough to share my thoughts by name. English is not native to me, it's true, But it’s the bridge through which my voice breaks through. I may not have the perfect words to say, But what I feel, I’ll find a way. Though my phrases sometimes falter, In this language, I still alter, What’s in my heart, so you can see, The thoughts that rise, the soul of me. -Rohini Bhute Gawali 

शोध बाबांचा

 बाबा कधी पाहिले नव्हते जीवनातले हे सुख राहिले होते कधी माझ्या बाबांना मी मामात तर कधी काकात शोधत होते कधी आजोबांत तर कधी शेजारच्या काकात शोधत होते लग्नानंतर तर सआसर्यांमधे शोधत होते पण शोध काही संपला नाही... मग बाळाने माझ्या एके दिवशी दाखवुन दिले  बाबा कसे असतात... आणि नकळतपणे नवर्यातच मला माझे बाबा दिसले. रोहिणी भुते गवळी

Modified Newton's Law

 To every action there is equal and opposite reaction but if the reaction is stopped it increases the impulse of the reaction...so it's always better to express the reaction at the very moment... -Rohini Bhute Gawali

प्रेम तुझे नि माझे

 तुझ्यासाठी प्रेम म्हणजे अंगाला झालेला स्पर्श.... माझ्यासाठी प्रेम म्हणजे हृदयात उठलेली स्पंदनं। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे हातात घेतलेला हात.... माझ्यासाठी प्रेम म्हणजे जन्मभराची साथ। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सतत व्यक्त होणारे बोल... माझ्यासाठी प्रेम म्हणजे नजरेने व्यक्त झालेले अबोल। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सौंदर्याचं आकर्षण.. माझ्यासाठी प्रेम म्हणजे दोघांचं भावनिक संकर्षण। तुझ्यासाठी प्रेम म्हणजे सतत केलेली तडजोड, माझ्यासाठी प्रेम म्हणजे मनापासुन जुळवलेले असे विजोड। -रोहिणी भुते गवळी

विठ्ठल साधावा

नको रडू पंढरीची वारी चुकली म्हणुनी.. विठ्ठलाला बघ जरा अंतःकरण उघडुनी.. तो नाहि पंढरपुरी, तो नाही चंद्रभागा तिरी.. तो आहे चराचरी त्यासी ओळख रे वेड्या तु सत्वरी । तु घे विठठ्ठलाची ध्यानमुद्रा नि हो मग्न.. बघ होतंय कि नाही सारे विश्व तुला संलग्न.. शिकवी आपणास तो, तुझेच सारे दीन ते बंधु.. रंग नाही गोरा म्हणुनि नको त्यांसी तु निंदु। अर्पियली नाही तुळशी म्हणुनि, होऊ नकोस तु दुःखी.. कर तुळशींची पेरणी , नि होउ दे प्राणवायुत वृद्धि.. तुझा विठ्ठल बघ त्वरेने तुझ्यासाठी धावेल वैकुंठाचे सुख तुला धर्तीवरच गावेल। चंदनाचा टिळा जसा जप तुझे चारित्र्य.. गरजुंच्या हाकेशी धावुनी जप विठ्ठलाचे मातृत्व.. सत्याची कास सोडु नकोस बेइमानिचा त्रास होउ नकोस.. सद्विचारांच्या गजरात भेट तु विठ्ठलाला प्रतिदिनी होई बघ आषाढीचा पर्व  साजरा। असाच जीवनाच्या किर्तनात आम्हास विठ्ठल भेटावा, नव्हे विठ्ठल साधावा। जय जय रामकृष्ण हरी। ‌जय जय रामकृष्ण हरी। -रोहिणी भुते गवळी

मुल्यांकन

  कधीतरी मुलींचं मुल्यांकन  तिच्या गुणांनी करायला शिका की हो.. नसेल ती खूप सुंदर अप्सरा नसेल ती परि लावण्या, कधीतरी तिच्या कष्टांच्या पराकाष्टेचा  अभिमान बाळगायला शिका की हो... नसेल ती कोमल कळी नसेल साजुक सोनसळी कधीतरी तिच्यातल्या मर्दानीला सलाम ठोकायला शिका की हो... नसेल तिचा रंग गोरापान नसेल तिचे डोळे मासळी सारखे छान कधीतरी तिच्या त्या प्रेमळ नि सच्चा मनाला साद द्यायला शिका की हो... नसेल ती घरकामात अव्वल नसेल ती स्वयंपाकात सुगरण कधीतरी तुमच्या मुलींनाच नाही तर  मुलांनाही घरकामात हातभार लावायला शिकवा की हो... पुस्तकात शिकवण्यापुर्ती नव्हे तर खऱ्या आयुष्यात मुलींना समान दर्जा  आता तरी..द्यायला शिका की हो.... - रोहिणी भुते गवळी

नुतनवर्षाभिनंदन

 बाह्य प्रगतीचे स्वप्न रेखीले कलामांनी २०२० चे पर्मेश्वराने साकारिले ते आंतरिक प्रगतीने। करुणा नसणरऱ्या कोरोनाचा शिरकाव झाला, नि माणसांचा स्मशानाकडे लोंढा उठला। भयाचे साम्राज्य  सर्वत्र पसरले, त्याने मानवाला  घरातच पिंजले। स्वच्छता, स्वास्थ्य नि स्वदेशीला जाग आली, नात्यांचा दुरावा संपुनी जीवांची ओढ वाढली। जनावरांनाही मिळाला कही काळ मोकाट पसारा, वृक्षानी घेतला थोडा श्वास मोकळा। जुन्या वर्षाने खरा धडा शिकविला उन्मत्त मानवाचा माजही  उतरवला। या जुन्या वर्षाच्या गर्भातुन अंकुरले मग नवे वर्ष बाराचा ठोका चुकताच मनी भरला आनंद नि हर्ष। चला मांडुया आता  आनंदाचा डाव, जुन्या वर्षातील अनुभवांच्या साथीनं जपुया हि सुखांची ठेव। - रोहिणी भुते गवळी

इवलेसे स्वप्न

  बस इवलेसे स्वप्न आहे.. दीनांना उत्पन्नाचे साधन द्यावे,  नि आत्मतृप्तीचे गोड फळ चाखावे ! बस इवलेसे स्वप्न आहे.. ज्ञानाचा उजेड द्यावा,  नि बुद्धिची कवाडे उघडावी! बस इवलेसे स्वप्न आहे.. अनाथांचा हात धरावा, नि अनेकांच्या हृदयाची साद व्हावी! बस इवलेसे स्वप्न आहे.. जमेल त्याचे डोळे पुसावे,  नि माझ्या गाली हास्य बाहरावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. माणसाला माणूसकीने जोडावे, नि सारे जग  आनंदी व्हावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. अजुनही थोड्या शिल्लक असलेल्या मि-पणाचा नाश व्हावा,  नि प्रेमाचे झरे ओसंडावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. स्वत्वातिल ईश्वरास ओळखावे, नि या जन्मिचे सार्थक व्हावे! बस इवलेसे स्वप्न आहे..माझे! - रोहिणी भुते गवळी.