खोडकर मुले कुचकुच बोलतात, अभिनय करतात थोडा वेळ जाताच कडाडून हसतात अशी हि मुलं का बरं करतात....... नेहेमीच त्याला कारण नसतं फक्त हसायचं वा बोलायचं असतं करायचं काय म्हणुन ओरडायच असतं ह्या मुलांच मन काय बर सांगत? आरडा-ओरडा दंगा मस्ती उठते मग एखादी हस्ती सुरू होते मजेदार कुस्ती.... ही मजा पाहुन मुली खुदुखुदु हसतात त्यावर विरजण घालीत शिक्षिका येतात.... ...
Posts
Showing posts from July, 2018
- Get link
- X
- Other Apps
माँर्डन देव सात करोड़ सिंहासनाला देव माँर्डन पावे त्याला... माँर्डन देव म्हणे , भाव -भक्ति नको मला केवळ वायुयान हवे फिरायला.... माँर्डन देव म्हणतो , "तुम मुझे सोना-धन दौलत दो, मै तुम्हे आबादी सुख दुंगा..।" गरिबाला कोण विचारे? आता देवही त्याला विसरला रे... रोकड्याच्या या काळात देवही रोकड्याला बळी पडला रे.... माणुस गरिबीन तडपून मेला कोणी गरिबीनं, तर कोणी बेरोजगारिनं गेला... मात्र श्रीमंतांच्या या विश्वात देवही लठ्ठ धनाने माँर्डन झाला...
- Get link
- X
- Other Apps
तु अशीच चालत रहा तु अशीच अविरत चालत रहा... विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करित रहा। न थांबता न अडखळता... यशाचे शिखर पदक्रांत करण्यास। न डगमगता, न थकता... अविश्रांत ...... समाजात स्वताःचे अस्तित्व निर्माण करण्यास। चालत रहा तु अशीच.... आधार नसेल कुणाचा, फक्त तु चालत रहा... आत्मविश्वासाने। बघ... यश,विजय, आनंद, सुख, सौख्य... तुझ्या दारात उभे असतील। म्हणुनच तु चालत रहा....
- Get link
- X
- Other Apps
माझी प्रिय सखी... माझी प्रिय सखी मनस्वी, मुख तुझे तेजस्वी..... वत्कऋत्व तुझे ओजस्वी, आचार तुझे तपस्वी..... कार्य करते यशस्वी, गुणांनी अशी तु राजस्वी.... बघा ही राजकन्या चालली युराज्ञी व्हावया, परि म्हणे नाळ मातीशी नको तुटाया.... आई-बाबांचा, बहिण-भावाचा, आत्या-मावशीचा, काका-मामाचा नि सख्या सवंगड्यांचा लाभो तिला आजन्म संग..... प्रेमाचा व यशाचा प्रवाह वाहो तिज जिवनी अथांग, हिच माझी प्रार्थना अनंत.....
- Get link
- X
- Other Apps
प्रिय बाबांस... कसे असेल तुझे प्रेम... कशी असेल ती गोडी..... बाबांच प्रेम द्यायला नशीबान केली मझ्यावर कुरघोडी.... बाबा काय असतात कधी कळलेच नाही मला... त्यांंच्या प्रेमाची आस धरुनी हा जीव माझा ओलावला... नाही म्हंटले कधी बाळ जपुन पोळी भाज.... नाही कधी कुणी दिली ती मायेची थाप..... लग्नाची घडी आली तरी का नाही हो बाबा तुम्ही माझ्या सोबत.... हट्ट नाही केला , ना केला मी दंगा.... आईला त्रास होवू नये यासाठी केला समजदारीचा धंदा..... कधी कधी वाटतं बाबा तुम्ही यावं परत... म्हणावं बाळ काळजी करु नकोस... मी बघून घेईल सारं.... दुसर्याच क्षणी विचार येतो ते आता शक्य नाही... नि बाबांच प्रेम तुझ्या नशीबी नाही.....