प्रिय बाबांस...
कसे असेल तुझे प्रेम...कशी असेल ती गोडी.....
बाबांच प्रेम द्यायला नशीबान केली मझ्यावर कुरघोडी....
बाबा काय असतात कधी कळलेच नाही मला...
त्यांंच्या प्रेमाची आस धरुनी हा जीव माझा ओलावला...
नाही म्हंटले कधी बाळ जपुन पोळी भाज....
नाही कधी कुणी दिली ती मायेची थाप.....
लग्नाची घडी आली तरी का नाही हो बाबा तुम्ही माझ्या सोबत....
हट्ट नाही केला , ना केला मी दंगा....
आईला त्रास होवू नये यासाठी केला समजदारीचा धंदा.....
कधी कधी वाटतं बाबा तुम्ही यावं परत...
म्हणावं बाळ काळजी करु नकोस...
मी बघून घेईल सारं....
दुसर्याच क्षणी विचार येतो ते आता शक्य नाही...
नि बाबांच प्रेम तुझ्या नशीबी नाही.....
Comments
Post a Comment