Posts

Showing posts from November, 2020

इवलेसे स्वप्न

  बस इवलेसे स्वप्न आहे.. दीनांना उत्पन्नाचे साधन द्यावे,  नि आत्मतृप्तीचे गोड फळ चाखावे ! बस इवलेसे स्वप्न आहे.. ज्ञानाचा उजेड द्यावा,  नि बुद्धिची कवाडे उघडावी! बस इवलेसे स्वप्न आहे.. अनाथांचा हात धरावा, नि अनेकांच्या हृदयाची साद व्हावी! बस इवलेसे स्वप्न आहे.. जमेल त्याचे डोळे पुसावे,  नि माझ्या गाली हास्य बाहरावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. माणसाला माणूसकीने जोडावे, नि सारे जग  आनंदी व्हावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. अजुनही थोड्या शिल्लक असलेल्या मि-पणाचा नाश व्हावा,  नि प्रेमाचे झरे ओसंडावे! बस इवलेसे स्वप्न आहे.. स्वत्वातिल ईश्वरास ओळखावे, नि या जन्मिचे सार्थक व्हावे! बस इवलेसे स्वप्न आहे..माझे! - रोहिणी भुते गवळी.

निसर्गाशी मैत्री

चला करुया निसर्गाची परतफेड, घालुया पुन्हा नव्याने सौंख्याची मुहुर्तमेढ‌ ! लवलवत्या पानावर झुळ झुळेल वारा, कोसळतिल भारावुनी मग श्रावणाच्या धारा! गारव्यात शुभ्र तर श्रावणात हिरवी साडी,  नेसुनी नटेल हि धरणी! नाही करावी लागणार मेघराजाला मग,  यज्ञ्याची मनधरणी! नाहि लागणार शुद्ध श्वासालाही ,  ऑक्सिजनचा मास्क! झऱ्याच्या त्या गोड‌ पाण्याने मिळेल,  तृष्णेला अवकाश! चला तर माझ्या बांधवांनो,  करुया जंगलाची पेरणी! परत देवूया धरणीच्या जिवांना,  त्यांची हक्काची धरणी! चला करुया नैसर्गिक जिन्नसांची निर्मिती, समतोल साधुया आता सृष्टिच्या संगती! - रोहिणी भुते गवळी.