मुल्यांकन
कधीतरी मुलींचं मुल्यांकन तिच्या गुणांनी करायला शिका की हो.. नसेल ती खूप सुंदर अप्सरा नसेल ती परि लावण्या, कधीतरी तिच्या कष्टांच्या पराकाष्टेचा अभिमान बाळगायला शिका की हो... नसेल ती कोमल कळी नसेल साजुक सोनसळी कधीतरी तिच्यातल्या मर्दानीला सलाम ठोकायला शिका की हो... नसेल तिचा रंग गोरापान नसेल तिचे डोळे मासळी सारखे छान कधीतरी तिच्या त्या प्रेमळ नि सच्चा मनाला साद द्यायला शिका की हो... नसेल ती घरकामात अव्वल नसेल ती स्वयंपाकात सुगरण कधीतरी तुमच्या मुलींनाच नाही तर मुलांनाही घरकामात हातभार लावायला शिकवा की हो... पुस्तकात शिकवण्यापुर्ती नव्हे तर खऱ्या आयुष्यात मुलींना समान दर्जा आता तरी..द्यायला शिका की हो.... - रोहिणी भुते गवळी