Posts

Showing posts from March, 2026

महिला दिन

 कर्तुत्व तर प्रत्येकी च असतं.. कुणाच दिसत, कुणाच दिसत नाही... कुणी खुप बोलकी असते नि व्यक्त होत असते.. कुणी खुप अबोल असते नि अव्यक्तच असते.. तिचे रंग अनेक असतात, कधी मायाळु , कधी भांडखोर, कधी सुश्रुषा, कधी मर्दानी, कधी कणखर... मात्र ती झटत असते फक्त आपल्या माणसांसाठी ती प्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध करत असते.. तिला आपल्या माणसांकडुन काहिच नको असतं फक्त प्रेम नि आदरात सगळं वेतन मोडत असतं... तिला दिला जातो ना मग एक दिवसाचा  महिला दिनाचा आदर.. जो पुरुषप्रधान संस्कृतीत नित्याने दिला जाउच शकत नाही.... तो सोन्याचा दिवस येईल ह्या आशेवरच तर तिची धडपड  चालली आहे.... तेव्हा मित्रांनो जमलं तर तुमच्या आयुष्यात येणार्या प्रत्येकीला जरा नित्याने देवुन बघा.... -रोहिणी भुते गवळी