Posts

Showing posts from March, 2019
पोर्णिमेच्या राती झाले होळीचे सम्मार्जन, दुर्गुणांचे दहन करुनी मन झाले निर्मळ। रुसवे सारे विसरुनी पिवळा रंग उधळला, मैत्रीच्या रंगात द्वेशाला थारा न उरला। गुलाबी उधळण गडद लाल झाली, प्रेमाच्या रंगात स्रुष्टि हि बुडाली। निळयाशार आभाळाखाली हिरवीगार सावली, नवचैतन्याची हवाच जणु पसरली। सोनेरी ती किरणे प्रगती घेउनी आली, पांढऱ्या शुभ्र रंगाने आत्मयाची पवित्रता जपली। होळीच्या ह्या दिवशी जीवन अनेक रंगात रंगले, नि मनात आनंद भरुनी गेले। माझ्याकडुन आपणांस होळीच्या खुप खुप शुभेच्छा। -रोहिणी भुते.