Posts

Showing posts from December, 2018
समाजात वजन वाढवण्यासाठी, आधी शारिरीक वजन कमी करावं लागत। शब्दांना महत्व यावे म्हणुन, कधी कधी अबोल व्हाव लागतं। यशाची पातळी गाठायला कधी कधी  अपयशी व्हावं लागत। आयुष्यात भरभरुन आनंदी होण्यासाठी  आधी दुःखी व्हावं लागत। गुलाबाचा सुगंध घ्यायला कधी कधी काट्यांना हाती घ्यावं लागतं। मनमुराद विश्रांती घ्यायला कधी कधी अविश्रांत चालावं लागत। मेहनतीला कमी करण्यासाठी आधी खूप खूप मेहनत करावी लागते। कुणाची कधीतरी आठवण काढायला आधी त्याला विसरावं लागत। सुटकेचा निःश्वास सोडण्यासाठी आधी भरभरुन श्वास घ्यावा लागतो। जीवनातील अर्थपुर्ण अश्रुंना लपवण्यासाठी  कधी कधी निअर्थक हसावं लागतं।